bharat jodo yatra update: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा.
bharat jodo yatra update:पुणे:(pune): ‘भारत जोडो’ यात्रेत (bharat jodo yatra) पुण्यातील १ हजार १५० पदाधिकारी सहभागी होणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात संबंधित पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत. राज्यात यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (pruthviraj chavhan) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
चव्हाण म्हणाले, ‘यात्रेनिमित्ताने शहरात तीन नोव्हेंबर रोजी मोटारसायकल रॅली (motorcycle rally) काढण्यात येणार आहे. ही यात्रा केवळ काँग्रेसची रॅली (congress rally) नसून एका तिरंग्याखाली काढण्यात आलेली समविचारी पक्षाची आणि नागरिकांची यात्रा आहे. यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून व्यापक चळवळीत त्याचे रुपांतर होत आहे. महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या यात्रेचा तपशील प्रदेश काँग्रेसला मिळाला असून त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. ‘यात्रेची राज्यातील सुरुवात नांदेड जिल्ह्यातील (nanded)देगलूर येथून होणार आहे. संघटनात्मक ६० विभाग असून, प्रत्येकाने कोणत्या ठिकाणी यात्रेत सहभागी व्हायचे, त्याचा तपशील देण्यात आला आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील (pune-pimpari chinchawad) पदाधिकारी बुलढाण्यात यात्रेत सहभागी होतील. त्यादृष्टीने विविध स्तरावरील व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
Must read
- Bihar Politics News : महागठबंधनला झटका..! ‘या’ नेत्याने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ निर्णय..
- तर यंदाही कांदा बियाणे तुटवडा..! पहा नेमके काय कारण ठरलेय शेतकऱ्यांच्या डोकेदुखीचे
- Lifestyle News: सोशल मीडिया मुलींसाठी जास्त धोकादायक का ठरतोय; अधिकच्या वापरामुळे वाढल्या समस्या
18 ते 20 नोव्हेंबर या दरम्यान पुण्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी बुलढाण्याला दाखल होणार आहेत. त्यासाठी एकूण 1 हजार 150 जणांची नोंदणी झाली आहे. यातील काही कार्यकर्ते पूर्णवेळ यात्रेत चालणार आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोथरूड (kothrud) ते आगाखान पॅलेस (agakhan palace) या दरम्यान मोटारसायकल रॅली काढण्यात येईल. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणची माती आणि नद्यांचे पाणी एकत्रित केले जाणार असून त्याद्वारे यात्रेत वृक्षारोपण केले जाईल. दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये तीन नोव्हेंबर रोजी पदयात्रा काढली जाणार आहे.