Bharat Jodo Nyay Yatra: मोठी बातमी! वेळेपूर्वी संपणार भारत जोडो न्याय यात्रा; ‘हे’ आहे कारण

Bharat Jodo Nyay Yatra  : भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्राची सुरुवात केली होती. मात्र आता ही यात्रा वेळेपूर्वी संपणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या या यात्रेचा लोकांमध्ये एक जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, भारत जोडो न्याय यात्रा 20 मार्चऐवजी 16 मार्चला संपणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे 17 मार्च रोजी मुंबईमध्ये  इंडिया अलायन्सची बैठक होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. याच बरोबर या बैठकीमध्ये जागावाटपाबाबात देखील चर्चा होणार आहे. यामुळे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा मुदतीपूर्वीच संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे सूत्रांच्या हवाल्याने दावा केला जात आहे की, लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात होऊ शकते.

हे जाणून घ्या कि राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला यावेळी मणिपूरमधून सुरुवात झाली. या प्रवासाची सांगता मुंबईत होणार आहे. यावेळी राहुल यांच्या या यात्रामध्ये इंडिया आघाडीचे मित्रपक्षही सहभागी झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राहुलसोबत यात्रेत सहभागी होत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तेजस्वी यादवही राहुलसोबत बिहारमध्ये दिसले होते.

राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ ? ‘त्या’ प्रकरणात पोलिस बजावणार समन्स; जाणून घ्या सर्वकाही…

मध्य प्रदेशानंतर राहुल गांधी गुजरातलाही जाणार

राहुल गांधींची न्याय यात्रा सध्या मध्य प्रदेशात आहे. यानंतर ते गुजरातला जाणार असून तेथून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मालेगाव, नाशिक, ठाणे मार्गे मुंबईत राहुलची यात्रा संपणार आहे. या यात्रामध्ये राज्यातील मित्रपक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे (उद्धव गट) आदित्य ठाकरेही सामील होऊ शकतात, असे मानले जात आहे.

Leave a Comment