Best Mileage Bikes : दैनंदिन वापरासाठी उत्तम मायलेज असलेल्या काही दुचाकी (Best Mileage Bikes) आहेत. हिरो ही भारतीय बाजारपेठेत बाइकची सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी आहे. Hero splendor Plus दुचाकीमध्ये 97.2cc सिंगल सिलिंडर इंजिन आहे. ही दुचाकी एल लिटर पेट्रोलमध्ये 70 ते 80 किलोमीटरपर्यंत चालवता येते. त्याची किंमत रु.74491 पासून सुरू होते.
भारतीय बाजारपेठेत बहुतेक लोक दुचाकी वापरतात. त्यामुळे दुचाकींची विक्री देखील वेगाने वाढत आहे. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरासाठी चांगले मायलेज देणारी दुचाकी शोधत असाल तर आज या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच काही दुचाकींबद्दल सांगणार आहोत ज्या खूप चांगले मायलेज देतात. यातील विशेष काय आहे ते जाणून घेऊ या.
TVS Sports
भारतीय बाजारपेठेत ही दुचाकी 110 सीसी सेगमेंटमध्ये येते. TVS भारतीय बाजारपेठेत दीर्घकाळापासून लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. ही दुचाकी 109.7 सिंगल सिलिंडर इंजिनसह सुसज्ज आहे, ज्याचा टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटर आहे. ही दुचाकी एकदा भरून तुम्ही सुमारे 80 किलोमीटर चालवू शकता. त्याची किंमत 59431 रुपयांपासून सुरू होते.
Bajaj CTX
ही दुचाकी बजाजकडून 115.45 सीसीच्या सिंगल सिलिंडरसह उपलब्ध आहे. ही दुचाकी 1 लिटर पेट्रोलवर 80 ते 85 किलोमीटर चालवता येते. त्याची किंमत 69216 रुपये आहे.
Hero Motocorp HF 100
Hero Motocorp ने ऑफर केलेल्या hf delux 100 दुचाकीची किंमत 57 हजार 012 रुपये आहे. या मोटरसायकलमध्ये 97.2 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे. दुचाकी एकूण 70 किलोमीटर धावू शकते.
Honda Shine 100
होंडाची ही मोटरसायकल 100 सीसी सेगमेंटमध्ये आहे. ही दुचाकी 98.98 सीसी सिंगल सिलिंडर इंजिनसह येते. ही दुचाकी एकूण 70 किलोमीटर धावू शकते. त्याची किंमत 64900 रुपये आहे.
Hero Splendor Plus
हिरो ही भारतीय बाजारपेठेत दुचाकीची सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी आहे. या दुचाकीमध्ये 97.2cc सिंगल सिलिंडर इंजिन आहे. ही मोटारसायकल एक लिटर पेट्रोलमध्ये 70 ते 80 किलोमीटरपर्यंत चालवता येते. त्याची किंमत रु.74 हजार 491 पासून सुरू होते.