Best Hatchback Cars : उत्तम मायलेज आणि फीचर्ससह येतात ‘या’ कार्स, किंमत 3.99 लाखांपासून सुरू

Best Hatchback Cars : भारतीय बाजारात कार निर्मात्या कंपन्यांनी कार्सची संख्या खूप वाढवली आहे. पण अशाही काही कार्स आहेत ज्या तुम्हाला उत्तम मायलेज आणि कमी किमतीत खरेदी कराव्या लागतील.

मारुती सुझुकी वॅगन-आर

मारुती सुझुकी वॅगन-आर ही देशातील एकमेव हॅचबॅक कार असून ज्यात 5 लोक सहज बसू शकतात. तुमची उंची 6 फिट असली तरीही तुम्हाला हेडरूमची समस्या जाणवणार नाही. कौटुंबिक वर्गाला ही कार आवडत असली तरी तरुणवर्ग यापासून दूर राहतो. याचे मुख्य कारण म्हणजे तिची बॉक्सी डिझाइन. मारुतीच्या या कारमध्ये 341 लीटरची बूट स्पेस दिली आहे, जिथे तुम्ही भरपूर सामान ठेवू शकता.

कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात 998cc पेट्रोल इंजिन आहे जे 66PS पॉवर आणि 89Nm टॉर्क निर्माण करते. आहे. ही कार एका लिटरमध्ये 25 किलोमीटरपर्यंत मायलेज देईल. ही कार हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार केली असून जी हलकी आणि मजबूत आहे. सुरक्षेसाठी, यामध्ये EBD, एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह हाय स्पीड अलर्ट सारखी फीचर्स दिली आहेत.

Maruti Celerio

मारुती सुझुकी सेलेरियो आता ग्राहकांना त्याच्या डिझाईनमुळे खूप आवडत असल्याने यात तुम्हाला चांगली जागा मिळेल. यात हेडरूम आणि लेगरूमची समस्या नाही.कारमध्ये चांगले फीचर्स पाहायला मिळतील.

कारमध्ये 998cc पेट्रोल इंजिन दिले आहे जे 66PS पॉवर आणि 89Nm टॉर्क निर्माण करेल. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सची सुविधा देण्यात आली आहे. ही कार एका लिटरमध्ये 25 किलोमीटरपर्यंत मायलेज देईल. ही कार हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर बनवली आहे जी हलकी आणि मजबूत आहे. सेफ्टीसाठी यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD, एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर आणि हाय स्पीड अलर्ट यांसारखी फीचर्स दिली आहेत. किमतीचा विचार करायचा झाला तर या कारची एक्स-शोरूम किंमत 5.36 लाख रुपयांपासून सुरू होते.

Renault Kwid

Renault Kwid ही एक चांगली कार आहे, याचे इंजिन पॉवरफुल आहे जे केवळ चांगले परफॉर्मन्स देत नाही तर चांगले मायलेजही देते. कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास Kwid मध्ये 999 cc चे इंजिन दिले आहे जे 67 bhp ची पॉवर आणि 91 Nm टॉर्क जनरेट करते.

याला 22 kmpl चा मायलेज सहज मिळतो, असा कंपनीचा दावा आहे. सुरक्षेसाठी, यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD, एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर आणि हाय स्पीड अलर्ट यांसारखी फीचर्स दिली आहेत. कंपनीच्या या कारमध्ये 8-इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम पाहायला मिळेल. कंपनीच्या या कारची किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होते.

Leave a Comment