Best Hatchback Car : तुम्ही आता तुमच्या बजेटमध्ये प्रीमियम हॅचबॅक कार खरेदी करू शकता. या कारमध्ये तुम्हाला 26kmpl चे मायलेज मिळेल. तुम्हाला कमी किमतीत फीचर्स देणारी कार खरेदी करता येईल. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Hyundai Grand i10 Nios कार
Hyundai ची Grand i10 Nios ही त्याच्या सेगमेंटमधील चांगली कार असून यात तुम्हाला केवळ उत्कृष्ट बिल्ड क्वालिटीच मिळत नाही तर त्यात चांगली जागा आणि शक्तिशाली इंजिन मिळेल. किमतीचा विचार केला तर या कारची एक्स-शो रूम किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू होते.
या कारमध्ये 1.2L Kappa पेट्रोल इंजिन असून ते 82 PS पॉवर आणि 113.8Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज असेल. कार एका लिटरमध्ये 20.7 kmpl (MT) आणि 20.1 kmpl (AMT) मायलेज देईल. सुरक्षिततेसाठी, Grand i10 Nios मध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम यांसारखी फीचर्स मिळतील.
टाटा अल्ट्रोझ कार
टाटा अल्ट्रोझ त्याच्या स्टायलिश डिझाईनमुळे चर्चेत असते. कारमध्ये जागा चांगली असून या कारमध्ये 5 लोक आरामात बसू शकतात. यात सुरक्षितताही पूर्ण आहे. Altroz मध्ये 1.2L पेट्रोल इंजिन आहे जे 3 सिलेंडरचे आहे आणि 88 PS चा पॉवर आहे जे 115 PS चा पॉवर देईल.
कारचे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास या कारची एक्स-शोरूम किंमत 6.64 लाख रुपयांपासून सुरू होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारमध्ये EBD सोबतच एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम सारखे फीचर्स असून कार 19-20km प्रति लीटर मायलेज देते.
मारुती सुझुकी नवीन स्विफ्ट कार
मारुती सुझुकीने नुकतीच नवीन स्विफ्ट लॉन्च केली असून कारची एक्स-शोरूम किंमत ६.४९ लाख ते ९.६४ लाख रुपये इतकी आहे. कारचे इंजिन आणि फीचर्स अधिक चांगले आहे. विशेष म्हणजे यामध्ये जागेची कमतरता भासणार नाही. नवीन स्विफ्टमध्ये नवीन Z सीरीजचे पेट्रोल इंजिन आहे जे 82 एचपी पॉवर आणि 112 एनएम टॉर्क जनरेट करते.
या शानदार कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. कार मॅन्युअल गिअरबॉक्सवर 24.8kmpl आणि AMT वर 25.75 kmpl चे मायलेज देईल. नवीन स्विफ्टच्या सर्व प्रकारांमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम यांसारख्या फीचर्ससह सुसज्ज आहेत.