Benglaru Traffic : आपल्या देशात शहरीकरण (Bengaluru Traffic) आणि औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे. शहरे अस्ताव्यस्त वाढत चालली आहेत. तशी वाहनांची संख्याही बेसुमार वाढत चालली आहे. त्यामुळे सहाजिकच प्रदूषण वाढत चालले असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाच्या बाबततीत मुंबई हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे.असा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर असाच एक धक्कादायक अहवाल मिळाला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मुंबई (Mumbai) हेच भारतातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असलेले शहर आहे तर जरा थांबा तुम्ही चुकीचा विचार करताय.
कारण, मुंबई नाही तर कर्नाटक राज्याची राजधानी असलेले बंगळुरू (Bengaluru) हे शहर जगातील दुसरे सर्वाधिक (Worlds most Congested City) ट्राफिक असलेले शहर बनले आहे.डच लोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट टॉम-टॉम यांनी प्रकाशित केलेल्या ट्रॅफिक इंडेक्सनुसार, सिटी सेंटर (BBMP एरिया) श्रेणीमध्ये २०२२ मध्ये बंगळुरूला जगातील दुसरे सर्वात जास्त ट्राफिक असलेले शहर म्हणून स्थान मिळाले आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण या शहरात दहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागतो.अवजड वाहतूक असलेल्या शहरांमध्ये लंडन शहराला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
कंपनीच्या मते देशातील सिलिकॉन सिटी बंगळुरू हे जगातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांपैकी एक आहे आणि जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे.हा क्रमांक जगभरातील शहरांना त्यांच्या प्रवासाच्या सरासरी वेळेनुसार दिला जातो. सन २०२२ मध्ये बंगळुरू शहराने १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे २९ मिनिटे आणि १० सेकंद घेतले, तर लंडनने हेच अंतर कापण्यासाठी ३६ मिनिटे २० सेकंदांची नोंद केली. आकडेवारीनुसार बंगळुरूमध्ये सतत गर्दी वाढत आहे. २०१९ मध्ये शहराला जगातील सर्वाधिक रहदारी असलेले शहर म्हणून क्रमांक देण्यात आला होता. २०२१ मध्ये बंगळुरूमधील प्रवासाचा कालावधी ४० सेकंदांनी वाढेल. २०२२ मध्ये बंगळुरूहून प्रवास करण्याचा सर्वात वाईट दिवस १५ ऑक्टोबर होता या दिवशी १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी ३३ मिनिटे ५० सेकंद लागले.
शहरात २०२२ मध्ये एकूण १००९ किलो कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित झाला होता. त्यापैकी २७५ किलो फक्त १० किलोमीटर वाहतुकीतून येत होता. त्यामुळे या शहरातील प्रदूषणाची पातळीही सातत्याने वाढत आहे. वाहतुकीचा विचार करता शहरातील सिग्नल आणि बाहेर जाणारी वाहतूक व्यवस्था सुधारली जात आहे.टॉमटॉमनुसार देशातील सर्वात जास्त वाहतूक असणाऱ्या शहरात बंगळुरू अव्वल क्रमांकावर आहे.त्यापाठोपाठ पुणे ६, नवी दिल्ली ३४ आणि मुंबई शहराचा ४७ वा क्रमांक आहे.