Breakfast recipe: आपल्याकडे प्रत्येक राज्यात खाद्यपदार्थ वेगळे पहायला मिळतील. पण, असेही काही खाद्यपदार्थ आहेत जे अनेक ठिकाणी दिसतात. यामध्ये कचोरीचे नाव आघाडीवर आहे. आता कचोरी अनेक राज्यातील पसंतीचे खाद्य पदार्थ ठरत आहेत. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने कचोरी तयार केली जाते. आज आम्ही तुम्हाला बंगाली स्टाइल कचोरी (Bengali Kachori) कशी तयार करायची याची माहिती सांगणार आहोत. बंगाली कचोरी पावसाळी नाश्ता (Breakfast) म्हणून खाऊ शकता. या खाद्यपदार्थाची चव चहासोबत घेता येते. पावसाळ्यात अनेकदा चटपटीत काहीतरी खावेसे वाटते, अशा परिस्थितीत बंगाली कचोरी तयार करण्यास हरकत नाही.
Coffee: कॉफी शरीराला करते का ताजेतवाने? पाहा संशोधनात काय आले समोर https://t.co/0AuaG2hbSG
— Krushirang (@krushirang) July 29, 2022
बंगाली कचोरी बनवण्यासाठी मटारसह इतर मसाले वापरतात. यासाठी तुम्ही फ्रोझन मटार वापरू शकता. बंगाली कचोरी बनवणे फारसे अवघड नाही. काही सोप्या पद्धती फॉलो करून तुम्ही बंगाली कचोरी तयार करू शकता.
साहित्य – गव्हाचे पीठ – 1 कप, हिरवे वाटाणे – 1 कप, मैदा – 1 कप, अद्रक हिरवी मिरची पेस्ट – 1 टीस्पून, साखर – 1 चमचा, तूप – 2 चमचे, लाल तिखट – 1/2 चमचा, जिरे पावडर – 1/4 चमचा, धने पावडर – 1/4 चमचा, हळद – 1/4 चमचा, जिरे – 1 चमचा, हिंग – चिमूटभर, तेल – तळण्यासाठी, मीठ – चवीनुसार.
Kidney Health : हे 3 लिंबू पेय किडनीसाठी आहे फायदेशीर, जाणुन घ्या डिटेल्स https://t.co/lCY43CIlgD
— Krushirang (@krushirang) July 29, 2022
रेसिपी
बंगाली कचोरी बनवण्यासाठी प्रथम गव्हाचे पीठ आणि मैदा एका परातीत ठेवा आणि दोन्ही मिक्स करा. मिश्रणात तूप टाकून गरम पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. यानंतर पीठ सुती कापडाने झाकून बाजूला ठेवा. आता कचोरीसाठी सारण तयार करणे सुरू करा. यासाठी प्रथम मटार उकळून घ्या. वाटाणे उकळल्यानंतर ते बारीक वाटून घ्या.
आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे व हिंग घालून परतून घ्या. जिरे तडतडायला लागल्यावर अद्रक-हिरव्या मिरचीची पेस्ट, वाटाणे, हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. यानंतर, मसाले आणखी काही काळ तळून घ्या, जेणेकरून मसाल्यातील ओलावा पूर्णपणे निघून जाईल.
आता पीठ घेऊन अजून एकदा मळून घ्या. यानंतर त्याचा गोळा तयार करून गोल आकारात लाटून घ्या. या पीठाच्या मध्यभागी चमच्याने किंवा हाताने सारण ठेवा, कडा गोळा करा आणि गोळे करा आणि जाड लाटून घ्या. तसेच गोळे करून जाडसर लाटून घ्या. यानंतर कढईत तेल तापायला ठेवा. तेल गरम झाल्यावर कचोऱ्या कढईत तळण्यासाठी ठेवा. कचोऱ्या चांगल्या तळायला 8-10 मिनिटे लागतील. कचोऱ्या दोन्ही बाजूंनी कुरकुरीत झाल्या की ताटात काढा. याप्रमाणे सर्व कचोऱ्या तळून घ्या. नाश्त्यासाठी बंगाली शैलीतील स्वादिष्ट कचोरी तयार आहेत.