Bengal Seat Sharing । लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणूक आयोग लवकरच निवडणुकीची घोषणा करू शकते. अशातच बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
टीएमसी नेते डेरेक ओब्रायन म्हणाले, “काही आठवड्यांपूर्वी, टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असे सांगितले होते की, टीएमसी बंगालमधील सर्व 42 जागांवर निवडणूक लढवत असून आता आम्ही आसाममधील काही जागांवर आणि लोकसभा जागेवर लढत आहोत. आम्ही आमचे उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात उतरवू. पण आमच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नाही.”
बंगालमध्ये काँग्रेसला फक्त दोन जागा
सूत्रांच्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी बंगालमध्ये काँग्रेसला फक्त दोन जागा देऊ इच्छित आहेत. पण काँग्रेस सध्या पाच जागांची मागणी करत आहे. ममता बॅनर्जी आपल्या मतावर ठाम राहून सांगतात की, 2019 मध्ये काँग्रेसला फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या.
तृणमूल काँग्रेस या वेळी त्या जागा काँग्रेसला देण्यास तयार असून बंगालमध्ये गेल्या वेळी जिंकलेल्या बेरहामपूर आणि मालदा (दक्षिण) व्यतिरिक्त काँग्रेसला भाजपच्या ताब्यातील दार्जिलिंग, मालदा (उत्तर) आणि रायगंज आणि पुरुलिया या जागा पाहिजे आहेत. पण या सर्व जागांवर ममता बॅनर्जींना मान्यता मिळण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे.
तृणमूल काँग्रेसला आसाममध्ये दोन आणि मेघालयात एक जागा हवी असे सूत्रांचे मत आहे, तरीही काँग्रेस मेघालयात जागा देण्याच्या बाजूने नाही. आसाममध्ये लोकसभेच्या 14 आणि मेघालयमध्ये दोन जागा आहेत.
‘एकला चलो रे’चा संदेश
ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी ‘एकला चलो रे’चा संदेश देत बंगालमधील 42 जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यापूर्वी 42 पैकी 2 जागा काँग्रेसला देण्याची ऑफर होती. पण काँग्रेस यापेक्षा जास्त मागणी करत होती. त्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, “काँग्रेसने पश्चिम बंगालमधील जागावाटपाचा माझा प्रस्ताव फेटाळला आहे. बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवू.”