Benefits of kiwi : हे लक्षात घ्या की किवी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. किवी फक्त प्लेटलेट्स वाढवण्यापासून ते बीपी नियंत्रित करण्यासाठी अनेक आजारांमध्ये हे फळ फायदेशीर आहे. जाणून घ्या किवी फळाचे आश्चर्यकारक फायदे.
प्लेटलेट्समध्ये होते वाढ
आजारपणामुळे शरीरात प्लेटलेट्सची तीव्र कमतरता असते त्यावेळी रुग्णांना डॉक्टर किवी खाण्याचा सल्ला देत असतात. डेंग्यूच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर असून हे रोज खाल्ले तर प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने वाढवता येते.
डोळ्यांसाठी आहे खूप फायदेशीर
अलीकडच्या काळात लहान वयातच लोकांना डोळ्यांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत असून किवीच्या सेवनाने दृष्टी सुधारते. असे असल्याने जर तुम्हालाही वाढत्या वयासोबत चष्म्याचा नंबर वाढवायचा नसेल तर तुम्ही त्याचा आहारात नक्कीच समावेश करावा लागेल.
वाढते रोगप्रतिकारशक्ती
किवीच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती सुधारली जाऊ शकते. हे लक्षात घ्या की हे अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतेच, तर बदलत्या हवामानात आणि या उष्णतेमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यास खूप मदत करते.
मिळतो बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम
पचनक्रिया मजबूत करण्यासोबतच किवीचे सेवन केले तर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असून जे पचनाच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस, अपचन किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असल्यास उन्हाळ्यात तुम्ही या फळाचा आहारात नक्कीच समावेश करू शकता.
रक्तदाब नियंत्रण
उच्च रक्तदाबाची समस्या असो किंवा स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी, प्रत्येक बाबतीत किवी फायदेशीर ठरते. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी हे फळ अवश्य खावे आणि इतकेच नाही तर यामुळे हृदय, मूत्रपिंड आणि स्नायूंचे आरोग्य सुधारते.