Black Tea Benefits : रोज सकाळी ब्लॅक टी पिण्याचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या

Black Tea Benefits : अनेकांना आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करावी वाटते. भारतात मोठ्या प्रमाणात चहाचे सेवन केले जाते. कित्येकजण दिवसातून कितीतरी वेळा चहाचे सेवन करतात. पण चहा आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. असे असूनही अनेकजण चहाचे प्रमाण कमी करत नाही. पण तुम्ही जर ब्लॅक टी चे सेवन केले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. कसे ते जाणून घ्या.

जाणून घ्या काळ्या चहाचे फायदे

  • ब्लॅक टी हा किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते.
  • काळ्या चहात असलेले कॅटेचिन्स आणि फ्लेव्होनॉइड्स त्वचेच्या संसर्गास प्रतिबंध करतात.
  • विशेष म्हणजे हे कोरोनरी रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारून हृदयाच्या समस्या दूर करते.
  • यामुळे आतड्यांसंबंधी समस्या देखील झपाट्याने दूर होतात.
  • हे अरुंद हवा नलिका उघडत असल्याने श्वास घेणे खूप सोपे होते. याचा दम्याच्या रुग्णाला फायदा होतो.यामुळे पचनाच्या समस्या देखील दूर होतात.
  • ब्लॅक टी प्री-मेनोपॉजच्या काळात स्तनाच्या कर्करोगाच्या धोक्यापासून संरक्षण करते.हे लक्षात घ्या की काळ्या चहामध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटी-ऑक्सिडंट असतात, जे त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवतात तसेच वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास खूप मदत करतात.
  • हे लक्षात घ्या की तेलकट त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
  • किरणोत्सर्गामुळे होणारे त्वचेचे नुकसान भरून काढण्यास ब्लॅक टी मदत करते.
  • ब्लॅक टीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित होते.
  • ब्लॅक टी मुळे मधुमेहाचा धोका कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • ब्लॅक टी शरीराला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते.
  • हे वजन नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करते.
  • ब्लॅक टीमध्ये थेफ्लाविन आणि थेअरुबिगिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते.

Leave a Comment