Belly Fat Reduce Tips : फक्त ‘या’ 5 टिप्स फॉलो करा; वेगाने कमी होईल पोटाची चरबी

Belly Fat Reduce Tips : आजच्या बदललेल्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्टफूडकडे लोकांचा (Belly Fat Reduce Tips) कल वाढत चालला आहे. यामुळे वजन वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. तासनतास एका जागेवर बसून काम केल्यानेही वजन वाढण्याच्या समस्येत भर पडली आहे. आजकाल अनेकांना पोटाची चरबी वाढण्याची समस्या जाणवू लागली आहे. लोक तक्रार करतात की त्यांच्या पोटाची चरबी खूप जास्त वाढली आहे. याशिवाय पोट वाढल्याने अनेक आजारही होतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत या टिप्सच्या मदतीने तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता तसेच तुम्हाला फिट राहण्यासही मदत होईल.

कोमट पाणी प्या

कोमट पाणी पिल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. सकाळी सर्वात आधी कोमट पाणी प्या. तुम्ही दिवसभर कोमट पाणी पिले तरीही चालू शकते. यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते. याशिवाय शरीराची पाचन क्रिया देखील सुधारते यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होते. त्यामुळे हा सोपा उपाय तुम्ही करून पाहण्यास काहीच हरकत नाही.

8 तासांची झोप आवश्यक

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप. जेव्हा तुम्हाला वजन किंवा पोटाची चरबी कमी करायचे असेल त्यावेळी शरीराला पुरेशी विश्रांती देणेदेखील आवश्यक आहे. यासाठी दररोज किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. यामुळे शरीराला ताजेतवाने होण्यास मदत मिळते.

Belly Fat Reduce Tips

Weight Loss Tips : वाढत्या वजनाने झालात हैराण? काळजी नको, ‘या’ सोप्या फॉलो कराच!

चालण्याचा व्यायाम करा

आज प्रत्येकाकडे दुचाकी, चारचाकी वाहने आहेत तसेच ऑफिसमध्ये तासनतास बसून काम करण्याची सवय वाढली आहे. या दोन गोष्टींमुळे शरीराच्या हालचाली मंदावल्या आहेत. व्यायाम करण्यासही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत किमान चालण्याचा व्यायाम तरी करू शकता. रोज काही मिनिटे चालल्याने शरीराला व्यायाम मिळतो आणि अनावश्यक वजन कमी होण्यास मदत मिळते. शरीराच्या हालचालीच्या दृष्टीनेही हे खूप महत्त्वाचे आहे.

व्यवस्थित जेवण करा

अनेकदा लोक वजन कमी करण्याच्या नादात खाणे पिणे कमी करतात परंतु हा योग्य पर्याय नाही. शरीराला रोजच्या कॅलरी तर मिळायलाच पाहिजेत परंतु जास्तीच्या कॅलरीची संख्या कमी करण्यासाठी बऱ्याचदा जेवण कमी केले जाते. पण हे योग्य नाही. जेव्हा तुम्ही जेवण कमी करता तेव्हा तुम्हाला जास्त भूक लागते ज्यामुळे कमी पौष्टिक अन्न खाण्याची इच्छा होऊ शकते.

Belly Fat Reduce Tips

Weight Loss । आहारात करा ‘या’ पदार्थाचा समावेश, महिन्याभरातच झपाट्याने कमी होईल वजन

जेवण वगळल्यानंतर तुम्ही नेहमीपेक्षा जास्त खाऊ लागता हा अनुभव अनेक वेळा दिसून आला आहे. त्यामुळे रोजच्या आहाराचे एक व्यवस्थित वेळापत्रक तयार करून घ्या आणि या वेळापत्रकानुसार खाण्यापिण्याच्या वेळा पाळा. यामुळे शरीरात च्या वजन वाढण्याची समस्या निर्माण होणार नाही.

हर्बल टी

अन्न खाल्ल्यानंतर साधारण दहा ते पंधरा मिनिटानंतर हर्बल टी प्या. हे अन्नाचे चांगले पचन करण्यास मदत करते आणि चयापचय प्रक्रिया देखील वेगवान करते. अशा प्रकारे तुम्ही शरीरातील जास्तीच्या कॅलरी बंद करू शकता आणि हर्बल टी हा पूर्णपणे शरीरासाठी योग्य आहे असे मत जाणकारांचे देखील आहे.

Leave a Comment