Congress MLA Resign : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ आमदाराने पक्षाला ठोकला रामराम

Congress MLA Resign : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रासह हरियाणामध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. माहितीसाठी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हरियाणातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार किरण चौधरी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

किरण चौधरी आज भाजपमध्ये प्रेवश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. किरण चौधरी यांनी पीटीआयला सांगितले की, त्यांची मुलगी आणि माजी खासदार श्रुती चौधरीही त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

यादरम्यान किरण चौधरी यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा यांच्यावर ताशेरे ओढले. त्यांची मुलगी श्रुती चौधरी, माजी खासदार, हरियाणा काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत.

किरण चौधरी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे कट्टर विरोधक मानले जातात. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भिवानी-महेंद्रगड मतदारसंघातून श्रुती चौधरी यांना तिकीट न दिल्याने ते नाराज असल्याचे समजते.

काँग्रेसने या जागेवरून विद्यमान आमदार आणि हुडाचे निष्ठावंत राव दान सिंग यांना तिकीट दिले होते, जे भाजपचे विद्यमान खासदार धरमबीर सिंग यांच्याकडून पराभूत झाले होते. यानंतर राव दान सिंह यांनी चौधरी यांच्यावर नाव न घेता  आरोप केले होते. 

किरण चौधरी यांनी याला विरोध करत तिकीटांचे योग्य वाटप केले असते तर काँग्रेसला येथून निवडणूक जिंकता आली असती, असे सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी पाच जागा जिंकल्या होत्या.

आणखी काय म्हणाले किरण चौधरी?

किरण चौधरी म्हणाल्या, ‘मी आणि श्रुती बुधवारी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत.’ मी आणि श्रुती दोघेही काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. श्रुती हरियाणा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी भिवानी येथे पत्रकार परिषद घेऊन पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. किरण चौधरी हे एका प्रभावशाली राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे सासरे बन्सीलाल हे हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

आपल्या राजीनाम्यामध्ये चौधरी यांनी आरोप केला आहे की, पक्ष एका खासगी इस्टेटप्रमाणे चालवला जात आहे, ज्यामध्ये त्यांच्यासारख्या प्रामाणिक आवाजाला जागा नाही. त्यांच्यावर अपमान करण्याचा आणि त्यांच्याविरोधात कट रचल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याशिवाय श्रुती चौधरी यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसवर निशाणा साधला. हरियाणा काँग्रेस एक व्यक्ती केंद्रित असल्याचा आरोप त्यांनी केला, त्यामुळे पक्षाच्या हिताशी तडजोड केली जात आहे. चौधरी बन्सीलाल आणि चौधरी सुरेंद्र सिंह यांच्या विचारसरणीला अनुसरून प्रदेश आणि राज्याच्या विकासाला माझे नेहमीच प्राधान्य राहील, असे ते म्हणाले.

Leave a Comment