दिल्ली – दिल्लीतील (Delhi) कोरोना रुग्णांचा (Corona patients) वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. देशाच्या राजधानीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी दिल्लीत कोरोनाचे 1 हजार 656 नवीन रुग्ण आढळले. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसला तरी संसर्गाचे प्रमाण 5.39 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या 24 तासांत 1306 लोक कोरोनामधून बरे होऊन घरी परतले आहेत.
दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी कोरोनाचे 1656 नवीन रुग्ण आढळले. शुक्रवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही तर 1306 रुग्ण बरे झाले आहेत. पण संसर्गाचे प्रमाण 5.39 टक्क्यांवर पोहोचले आहे. दिल्ली सरकारने कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर चिंता व्यक्त केली आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
विशेष म्हणजे गेल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल सादर केला होता. ज्यामध्ये असे सांगण्यात आले की भारतात 2020 ते 2021 दरम्यान कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू झाला. ज्यावर भारत सरकारने आक्षेप घेतला होता. डब्ल्यूएचओच्या अहवालावर, दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी सांगितले की राजधानी दिल्लीत कोविड -19 महामारीमुळे मृत्यूची अशी एकही घटना नाही ज्याची गणना केली गेली नाही.