BCCI President: New Delhi: भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. १९८३ विश्वचषक चॅम्पियन गोलंदाज रॉजर बिन्नी (Roger Binny) बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. माजी कर्णधार सौरव गांगुलीचा (Saurav Ganguly) कार्यकाळ १८ ऑक्टोबरला (मंगळवार) संपला. बीसीसीआयची सूत्रे हाती घेताच बिन्नीने मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. सर्वप्रथम त्यांनी दोन गोष्टींकडे लक्ष देण्याचे सांगितले.
🚨 Update 🚨: 91st Annual General Meeting of BCCI
The 91st Annual General Meeting of the Board of Control for Cricket in India (BCCI) was held on October 18th, 2022, in Mumbai.
The key decisions made are as under 🔽https://t.co/c2XV2W2Opl
— BCCI (@BCCI) October 18, 2022
मंगळवारी मुंबईत बीसीसीआयच्या ९१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी यांची बोर्ड अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. या पदासाठी दुसरा उमेदवार नव्हता. त्यांची एकमताने नवीन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ६७ वर्षीय रॉजर आता सौरव गांगुलीच्या जागी ही जबाबदारी स्वीकारणार आहे.
ANI शी बोलताना बिन्नी म्हणाले, “BCCI अध्यक्ष म्हणून मी प्रथम दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे खेळाडूंच्या दुखापतीवर नियंत्रण कसे ठेवायचे. जसप्रीत बुमराहला टी-२० विश्वचषकापूर्वी दुखापत झाली होती. या एका गोष्टीचा भारतीय संघाच्या संपूर्ण योजनेवर मोठा परिणाम झाला. दुसरी गोष्ट अशी की, देशात तयार होणाऱ्या खेळपट्ट्यांकडे मला लक्ष द्यायला आवडेल.
- हेही वाचा:
- Agriculture News: शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून दुहेरी दिवाळी भेट; पहा काय असेल ही भेट
- Solar Energy: हे देशातील पहिले सोलर गाव म्हणून होणार घोषित; येणाऱ्या काळात होतील गावे स्वयंपूर्ण…
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रॉजर बिन्नी यांना या पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला की भारतीय क्रिकेट पूर्णपणे उजव्या हातात आहे. भारतीय क्रिकेट खूप मजबूत आहे आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो.
भारताकडून खेळताना रॉजरने १९८३ च्या विश्वचषकात मॅचविनिंग (Match Winning) कामगिरी केली होती. तो केवळ भारतातीलच नव्हे तर स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज (Bowler) होता. रॉजरने ८ सामन्यात १८ विकेट घेतल्या.