BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आज नवा अध्यक्ष मिळणार आहे. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बीसीसीआय वार्षिक सर्वसाधारण सभा (BCCI Annual General Meeting In Mumbai) सुरू झाली आहे. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly), सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि माजी दिग्गज क्रिकेटर रॉजर बिन्नी या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीनंतर मंडळाच्या नव्या अध्यक्षाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
विद्यमान अध्यक्ष गांगुली यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे नव्या अध्यक्षांसाठी शोध सुरू आहे. काही नावे विचारात आहेत. त्यांच्यामधून नवीन अध्यक्षांची निवड केली जाऊ शकते. अद्याप काहीही स्पष्ट नाही. मंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतरच अध्यक्षपदाबाबत काय निर्णय घेतला किंवा घेतला गेला नाही, याबाबत माहिती मिळू शकते.
या बैठकीत बीसीसीआय पुढील अध्यक्ष (BCCI New President) आणि आयसीसी अध्यक्षपदासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची निवड ही केवळ औपचारिकता आहे. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी (Roger Binny) अध्यक्षपदासाठी सज्ज झाले आहेत. त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे बोलले जात आहे.
उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला, सचिवपदी जय शहा (Jay Shah), कोषाध्यक्षपदी आशिष शेलार, सहसचिवपदी देवजित सैकिया आणि आयपीएल अध्यक्षपदी अरुण धुमाळ यांची निवड करण्यात आली. बीसीसीआयने आयसीसी अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार उभा करायचा की विद्यमान अध्यक्ष ग्रेक बार्कलीला आणखी एका टर्मसाठी पाठिंबा द्यायचा की नाही यावर चर्चा करण्यासाठी बोर्ड सदस्य वार्षिक बैठकीत भेटतील.
आयसीसी अध्यक्षपदासाठी (ICC President) नामांकनाची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. मेलबर्न येथे 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ICC बोर्डाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. अलीकडेच आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीच्या नावाची चर्चा होती, मात्र अद्याप त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. दरम्यान, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अध्यक्षपदासाठी गांगुली अर्ज भरणार असल्याची बातमी आली. आता भारताच्या माजी कर्णधाराच्या नावावर विचार होतो की नाही हे पाहायचे आहे.
- Cricket News: ICC टी-२० क्रमवारीत भारताचा हा फलंदाज चमकला; पहिल्या १० मध्ये एकमेव भारतीय फलंदाज
- ICC T20 World Cup : आता क्रिकेटमध्ये पावसाचे टेन्शन नाही; आयसीसीने केलीय ‘ही’ खास तयारी, जाणून घ्या..