BCCI announces next tour: Mumbai: न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यासाठी भारतीय T20 संघ आणि ODI संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्फोटक अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. ऋषभ पंतला (Rishabh Pant) संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि दिनेश कार्तिक आणि मोहम्मद शमीसारखे वरिष्ठ खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग असणार नाहीत. या दौऱ्यात शिखर धवन भारतीय एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वीकारणार आहे. त्याचबरोबर रोहितसह सर्व वरिष्ठ खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) वनडे मालिकेत पुनरागमन करतील.
न्यूझीलंड दौऱ्याव्यतिरिक्त बीसीसीआयने (BCCI) बांगलादेश दौऱ्यासाठीही टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडिया डिसेंबरमध्ये (December) तीन एकदिवसीय (ODI) आणि दोन कसोटी (Test) सामन्यांच्या मालिकेसाठी शेजारी देशाचा दौरा करणार आहे. अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांना कसोटी संघात स्थान मिळालेले नाही.
🚨NEWS: The All-India Senior Selection Committee has picked the squads for India’s upcoming series against New Zealand and Bangladesh.
— BCCI (@BCCI) October 31, 2022
Squad for Bangladesh ODIs:
Rohit Sharma (C), KL Rahul (vc), Shikhar Dhawan, Virat Kohli, Rajat Patidar, Shreyas Iyer, Rahul Tripathi, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Ravindra Jadeja, Axar Patel, W Sundar, Shardul Thakur, Mohd. Shami, Mohd. Siraj, Deepak Chahar, Yash Dayal
— BCCI (@BCCI) October 31, 2022
Squad for NZ T20Is:
Hardik Pandya (C), Rishabh Pant (vc & wk), Shubman Gill, Ishan Kishan, Deepak Hooda, Surya Kumar Yadav, Shreyas Iyer, Sanju Samson (wk), W Sundar, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Arshdeep Singh, Harshal Patel, Mohd. Siraj, Bhuvneshwar Kumar, Umran Malik.
— BCCI (@BCCI) October 31, 2022
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एकाच वेळी चार संघांची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बांगलादेशमध्ये रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल तर कोहली आणि अश्विनही खेळतील. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, “कोणीही विश्रांतीची मागणी केलेली नाही. खेळाडूंच्या कामाचा ताण पाहता सर्व निर्णय घेण्यात आले. कोणाला, कधी आणि कशी विश्रांती द्यायची यावर वैद्यकीय पथकाचा अहवाल आमच्याकडे आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद पटेल, हर्षल पटेल. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, यूएमसी मलिक, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि अर्शदीप सिंग.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022 Shoaib Akhtar: ‘हा’ क्रिकेटर भारताविषयी पुन्हा बरळला; पहा काय म्हणाला आता
- ICC T20 World Cup AUS vs IRE: ‘या’ टीमच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवित; फिंचने केली कमाल
- ICC T20 World Cup 2022 Suryakumar Yadav: ‘या’ क्रिकेटरची सर्वत्र वाहवा; पहा कोणी केले या क्रिकेटरचे कौतुक
न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचे वेळापत्रक
पहिला T20 – 18 नोव्हेंबर, वेलिंग्टन
2रा T20 – 20 नोव्हेंबर, बे ओव्हल
तिसरी टी20 – 22 नोव्हेंबर, नेपियर
पहिली वनडे – २५ नोव्हेंबर, ऑकलंड
दुसरी वनडे – २७ नोव्हेंबर, हॅमिल्टन
तिसरी वनडे – ३० नोव्हेंबर, क्राइस्टचर्च
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर.
बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय – ४ डिसेंबर, ढाका
दुसरी वनडे – ७ डिसेंबर, ढाका
तिसरी वनडे – १० डिसेंबर, ढाका
पहिली कसोटी – १४ ते १८ डिसेंबर, चितगाव
दुसरी कसोटी – 22 ते 26 डिसेंबर, ढाका