BBC documentary: मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाबद्दल जगभरात चर्चा सुरू आहेत. यामुळे एका अर्थाने खळबळ पण उडाली आहे. त्यामुळेच मोदी, मनुवादी आणि भाजप समर्थक यांच्याकडून बीबीसीच्या या माहितीपटाला भारतापासून लंडनपर्यंत विरोध होत आहे. भारत सरकारने या माहितीपटावर घातलेल्या बंदीच्या विरोधात काही लोक उभे राहिले आहेत. तर, विरोधी पक्षांनी तो मुद्दा तापवला आहे. मात्र, एकूण रंगारंग लक्षात घेता यातून वेगळ्या अर्थाने कोणाला राजकीय फायदा होणार, याचीही चर्चा सुरू आहे.
बंदी घातलेल्या या डॉक्युमेंट्रीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील स्क्रीनिंगवरून डाव्या विद्यार्थी संघटनांनी जेएनयू आणि जामियामध्ये गोंधळ घातला आहे. या माहितीपटावर बंदी घालून सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करत असल्याचे विरोधी पक्ष आणि संघटना यांचे म्हणणे आहे. तर, मोदी म्हणजे भारत या लाइनवर असलेल्या केंद्र सरकारने हा देशविरोधी अपप्रचार असल्याचे म्हटले आहे. याबद्दल भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की, यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G-20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. म्हणून अशा प्रकारची दिशाभूल करणारी आणि खोटा माहितीपट जाणीवपूर्वक प्रसिद्ध केला जात आहे. (43 Films Have Also Been Banned In India, Indira Gandhi Govt Banned Kishore Kumar’s Song)
मात्र, केंद्र किंवा राज्य सरकार यांच्याकडून देशात अशा प्रकारच्या माहिती देणाऱ्या चित्रपटावर किंवा गीतांवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही भारतात तब्बल ४३ चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, नंतर यापैकी काही चित्रपट किंवा गीत यांना प्रसिद्ध करण्यास परवानगी देखील दिली गेली. परंतु काही अद्याप बंदीच्या वेस्टनात आहेत. आता विरोधात असलेल्या काँग्रेसची सत्ता असतानाच बहुतांश निर्बंध लादले गेले होते. हाही इतिहास आहे. ब्रिटीश प्रसारक कंपनी BBC ने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ (India: The Modi Question) नावाची नवीन दोन भागांची मालिका तयार केली आहे. त्याचे दोन्ही भाग प्रसिद्ध झाले आहेत.
या मालिकेत सुरुवातीच्या काळात म्हणजे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासावर चर्चा करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध, भाजपमधील त्यांचा वाढता दबदबा आणि गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची झालेली नियुक्ती यावरही चर्चा झाली आहे. मात्र, अर्थात या संपूर्ण मालिकेत सर्वाधिक चर्चा आहे ती मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये झालेल्या दंगलीची आणि सार्वजनिक स्तरावरील नरसंहाराची. याशिवाय पंतप्रधान मोदींची प्रतिमा एका विशिष्ट धर्माविरुद्ध असलेले नेते अशी यात मांडण्यात आली आहे. ही मालिका अजूनही भारतात प्रसारित झाली नाही. परंतु सध्या ती लंडनसह जगातील अनेक देशांमध्ये बीबीसीद्वारे प्रसारित केली जात होती. यावरून हा वाद निर्माण झाला आहे.
यावर केंद्र सरकारचा दावा आहे की पीएम मोदींची प्रतिमा यात चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. तसेच भारत-ब्रिटन यांचे संबंध बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. या दोन्ही देशांमध्ये व्यापार करार असून अशी डॉक्युमेंट्री बनवून ब्रिटन आणि भारतात बसलेल्या काही लोकांनी मिळून हा करार मोडीत काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यासह यावर्षी भारताला G-20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून त्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करत आहेत. या पार्श्वभूमीवर अशी दिशाभूल करणारा माहितीपट प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप आहे. काहींना वाटते की, ऋषी सुनक यांच्या रूपाने प्रथमच भारतीय वंशाचा हिंदू पंतप्रधान ब्रिटनमध्ये झाला आहे. सुनक आणि मोदी यांची चांगली मैत्री असून या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून पंतप्रधान सुनक यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संपूर्ण माहितीपटात हिंदू धर्मातील लोकांचे चुकीचे चित्रण करण्यात आले असून अशा परिस्थितीत बीबीसीने या माहितीपटाद्वारे हिंदू धर्माच्या लोकांची बदनामी करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
1975 मध्ये कॉँग्रेस सरकारच्या आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांनी स्वत:च्या आवाजात सरकारी योजनांची माहिती गीताद्वारे द्यावी, अशी तत्कालीन काँग्रेस सरकारची इच्छा होती. त्यावेळी काँग्रेसला अशा आवाजाची गरज होती. जशी आता बहुसंख्य कलाकार देशाचा आवाज असल्याचे भासवून सरकारची प्रतिमा सुधारत आहेत. गायक किशोर कुमार हे अजूनही खूप लोकप्रिय आहेत. तत्कालीन सरकारी यंत्रणेने त्यावेळी किशोर कुमार यांच्याशी संपर्क साधला. इंदिरा गांधी सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्री व्ही सी शुक्ला यांनी किशोर कुमार यांना संदेश पाठवला. त्यात इंदिरा गांधींसाठी गाणे गाण्यास सांगितले होते. जेणेकरून इंदिरा सरकारचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. परंतु जनता, प्रेक्षक, नागरिक आणि चाहते यांच्यासह समाजाच्या विचारांना महत्व देणाऱ्या किशोर कुमार यांनी त्यास स्पष्ट नकार दिला होता. तत्कालीन इंदिरा काँग्रेस त्यामुळे इतकी नाराज झाली की त्यांनी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घातली होती. अर्थात ही बंदी 3 मे 1976 पासून आणीबाणी संपेपर्यंत कायम होती. नंतर इंदिरा गांधी यांचे सरकार आल्यावर पुन्हा त्यांचे गाणे बंद ठेवण्यात आले नाहीत. पण ही एक महत्वाची घटना आहे.
भारतात विविध कारणांमुळे चित्रपटांवर बंदी घालण्याचा मोठा खूप इतिहास आहे. एकूण नोंदीनुसार 1955 मध्ये समर टाईम नावाच्या चित्रपटावर भारतात पहिल्यांदा बंदी घालण्यात आली. या चित्रपटात एका अमेरिकन महिलेची व्यक्तिरेखा दाखवण्यात आली होती जी इटलीतील एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडते. इतक्या कारणाने भारतात यावर बंदी घालण्यात आली होती. याशिवाय 1959 मध्ये नील अक्षर नीचे आणि 1963 मध्ये गोकुळ शंकर या चित्रपटावरही भारत सरकारने बंदी घातली होती. गोकुळ शंकर या चित्रपटात महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेच्या मनोवैज्ञानिक प्रेरणांचे चित्रण केल्याचा आरोप होता. 1973 मध्ये गरम हवा नावाच्या चित्रपटावरही तब्बल नऊ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटात भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी एका मुस्लिम कुटुंबाची कथा सांगितली होती. त्याने काहींच्या भावना दुखावल्या होत्या.
यासह 1975 मध्ये आलेल्या ‘आँधी’ या चित्रपटाची देशात सर्वाधिक चर्चा झाली. त्यावरही तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने बंदी घातली मात्र, होती. नंतर जनता पक्षाचे सरकार आल्यावर यावरील बंदी उठवण्यात आली. या चित्रपटात संजीव कुमार, सुचित्रा सेन यांनी भूमिका आणि गुलजार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पतीच्या संबंधांवर आधारित असल्याचा आरोप काँग्रेसने केला जात होता. सिनेमात किशोर कुमार आणि लता मंगेश्वर यांनी गाणी गायली होती. नंतर 1977 मध्ये अमृत नाहटा यांनी एक चित्रपट केला होता. ज्याला ‘किस्सा कुर्सी’ असे नाव देण्यात आले. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी या चित्रपटात दाखवण्यात आली. त्यावेळी संजय गांधी यांच्या समर्थकांनी सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयातून चित्रपटाची मास्टर प्रिंट आणि सर्व प्रती काढून घेतल्या आणि जाळल्याचा आरोप आहे. मात्र, नंतर हा चित्रपट इतर कलाकारांना घेऊन बनवला गेला. याशिवाय केंद्र सरकारने 1993 प्रसिद्ध झालेल्या कूथरपाथीरिकाई या तमिळ चित्रपटावरही बंदी घातली होती. कारण, या चित्रपटाची कथा माजी पंतप्रधानांच्या हत्येशी संबंधित होती. यामुळेच 2007 पर्यंत या चित्रपटावर बंदी होती. त्याचप्रमाणे 2014 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांवर बनलेल्या ‘कौम दी हीरे’ या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती.
1994 मध्ये दस्यू सुंदरी फूलन देवी यांच्यावर आधारित चित्रपट ‘बॅन्डिट क्वीन’ या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती. नंतर मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही बंदी उठवण्यात आली. 1971 मध्ये सिक्कीम, 1979 मध्ये खाक आणि खून, 1984 मध्ये इंडियाना जोन्स अँड द टेंपल अँड डूम, 1987 मध्ये पति परमेश्वरा, 1996 मध्ये कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह अँड फायर अशा चित्रपटांवरही बंदी घालण्यात आली होती. दोन्ही चित्रपटांमध्ये खूप लैंगिक सामग्री होती. फायर हा चित्रपट दोन महिलांमधील लेस्बियन नात्याची कथा असल्याने याआधी सेन्सॉर बोर्डाने त्यावर बंदी घातली होती. मात्र, नंतर तो काहीही कट न करता प्रकाशित करण्यात आला. 2001 मध्ये पंच, 2003 मध्ये हवाईयन, 2004 मध्ये पिंक मिरर, फायनल सोल्युशन, हवा आने दे यांसारख्या चित्रपटांनीही बंदीचा सामना केला. पिंक मिररमध्ये समलिंगी संबंध दाखवले गेले, तर फायनल सोल्युशनमध्ये गुजरात दंगलीचा मुद्दा होता, तर हवाईनमध्ये शीख दंगली दाखवण्यात आल्या होत्या. 2016 मध्ये मोहल्ला अस्सीवरही बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. 2017 मध्ये ‘नीलम’ने श्रीलंकेचे गृहयुद्ध आणि तमिळ संघर्षाचे चित्रण केले म्हणून तर, खलिस्तानी दहशतवादी तुफान सिंगवर बनलेल्या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती.
आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत 43 चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, यापैकी काहींना नंतर हिरवा सिग्नलही मिळाला. ज्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली त्यात 1955 मध्ये समर टाईम, 1959 मध्ये नील अक्षर नीचे, 1963 मध्ये गोकुळ शंकर, 1973 मध्ये गरम हवा, 1975 मध्ये आंधी, 1977 मध्ये किस्सा कुर्सी का, 1971 मध्ये सिक्कीम, 1971 मधील खाक और खून आणि 19 मधील भारतीय चित्रपटांचा समावेश होता. 1984 मध्ये टेम्पल ऑफ डूम, 1987 मध्ये पति परमेश्वरा, 1993 मध्ये कुथरापाथिरिक्काई, 1994 मध्ये बॅन्डिट क्वीन, 1996 मध्ये कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह, 1996 मध्ये फायर, 2001 मध्ये पंच, 2001 मध्ये हवायेन, 2003 मध्ये पिंकल, 2003 मध्ये समाधान आणि हवा आने दे, 2005 मध्ये ब्लॅक फ्रायडे, अमू, वॉटर, 2009 मध्ये हैद अनहद, 2011 मध्ये द गर्ल विथ ड्रॅगन टॅटू, 2013 मध्ये चत्रक, पापिलो बुद्ध, 2014 मध्ये गुर्जर आंदोलन ए फाईट फॉर राइट, 2014 मध्ये फायर झोन, कौम द हीरे, फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे, 2015 मधील मैं हूं रजनीकांत, अनफ्रीडम, इंडियाज डॉटर, पट्टा पट्टा दा सिंघन दा वारी, पोरकालाथिल ओरू पू, द मास्टरमाइंड जिंदा सुखा, द पेंटेड हाउस, मुत्तुपुलिया, मोहल्ला अस्सी 2016 मध्ये मोरचा, नीलम आणि तुफान चित्रपटांना 2017 मध्ये बंदीचा सामना करावा लागला आहे. यातील अनेक चित्रपटांमध्ये अतिरेकी आणि दहशतवाद्यांचा गौरव करण्यात आला होता. काही चित्रपटांना नग्नता आणि आशयामुळे बंदीला सामोरे जावे लागले, असे आरोप आहेत.