Baramati Lok Sabha | बारामतीत अजितदादाही रिंगणात? ‘या’ कारणामुळे महायुतीनं केलं खास प्लॅनिंग

Baramati Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू (Baramati Lok Sabha Election 2024) आहे बारामती मतदारसंघाची निवडणूक राज्यात आणि देशभरात चर्चेत आहे या मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे या दोन्हींपैकी कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं याचा निर्णय मतदार घेणार आहेत मतदार कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार याचे उत्तर निकालाच्या दिवशीच मिळेल परंतु या मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण अशी लढत होणार की काय अशी शक्यता ही आता दिसू लागली आहे यामागे कारणही आहे महायुतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिलेली असतानाही अजित पवार यांच्या नावाने सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे आता हे नेमकं कसं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार येथे 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत निवडणूक अधिकारी कार्यालयातून अर्जही नेले आहेत याचबरोबर अजित पवार यांच्या नावानेही अर्ज देण्यात आला आहे याची माहिती मिळाली आहे त्यामुळे आता अजित पवार बारामतीत डमी उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Baramati Lok Sabha : बारामतीत नणंद-भावजयमध्ये सामना; अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी

Baramati Lok Sabha

सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज काही कारणांनी बाद झाला तर ऐनवेळी उमेदवारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशावेळी पर्याय पाहिजे त्यामुळेच अजित पवार यांच्या नावाने एक अर्ज देण्यात आल्याची माहिती आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची चर्चा देशभरात होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबातील सदस्य या निवडणुकीत आमने-सामने आहेत सुनेत्रा पवारांनी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले आहे अशा परिस्थितीत उमेदवारीवरून काही अडचणी निर्माण होऊ नये याची काळजी महायुतीकडून घेण्यात येत आहे.

महत्त्वाच्या मतदारसंघात ऐनवेळी काही अडचणी उभ्या राहू नयेत यासाठी राजकीय पक्षांकडून खबरदारी म्हणून हा पर्याय निवडला जातो मतदारसंघात ज्या उमेदवाराला तिकीट दिली आहे तो उमेदवारी अर्ज भरतो परंतु त्याचबरोबर देखील अर्ज भरून ठेवतो जर काही कारणांमुळे प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून हा पर्याय निवडला जातो. बारामती मतदारसंघात आता त्यामुळे अजित पवार देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी शक्यता दिसत आहे.

Baramati Lok Sabha

Ajit Pawar in Baramati: सर्वात मोठी बातमी! ‘त्यांना’ मिळणार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी

Leave a Comment