Baramati Legislative Assembly : ‘असे’ असेल बारामती विधानसभेच्या जागांचं गणित, पहा सविस्तर

Baramati Legislative Assembly : राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेला राज्यात महायुतीला अपेक्षित असा विजय मिळवता आला नाही, त्यामुळे आता आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही बारामती मतदारसंघाची जोरदार तयारी होऊ लागली आहे. बारामती लोकसभेत दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे 6 विधानसभा मतदारसंघ येत असून दौंडमधून राहुल कूल भाजपचे आमदार आहेत. इंदापुरातून अजितदादा गटाचे दत्तात्रय भरणे, बारामतीतून अजित पवार, पुरंदरमधून काँग्रेसचे संजय जगताप, भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर आमदार हे आहेत.

बारामती विधानसभांमध्ये संभाव्य लढती आणि इच्छूकांची नावं पाहायची झाली तर बारामतीत महायुतीतून अजित पवार मविआतून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर भोरमध्ये महायुतीत भाजपकडून किरण दगडे, जीवन कोंडे, शिंदे गटाकडून कुलदिप कोंडे इच्छूक आहेत.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे उमेदवार, दौंडमध्ये महायुतीकडून भाजपचे राहुल कुल, भाजपचे वासुदेव काळे, अजित पवार गटाकडून रमेश थोरात हे निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. शरद पवार गटाकडून आप्पासाहेब पवार आणि नामदेव ताकवणे यांचे नाव चर्चेत आहे.

पुरंदरमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे विजय शिवतारे, भाजपचे अशोक टेकवडे, बाबा जाधवराव हे निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. मविआकडून संजय जगताप, खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर, अजित पवार गटाचे सचिन दोडके, रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत आहे, तर मविआतून अद्याप कुणाचीही चर्चा नाहीय.

Leave a Comment