दिल्ली : कडाक्याच्या उन्हाळ्यात दिलासा देणाऱ्या लिंबाच्या किंमती (Lemon Price) सध्या प्रचंड वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून लिंबाच्या दरात कमालीची वाढ होत आहे. जे लिंबू काही दिवसांपूर्वी शंभर रुपये किलोने विकले जात होते, आज त्याच्या दरात सुमारे अडीच ते तीनपट वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये एक लिंबू 15 रुपयांपर्यंत विकले जात आहे. अशा परिस्थितीत येथील लिंबू विक्री करणारे दुकानदार आता हातात काठी घेऊन लिंबाचे संरक्षण करत आहेत. त्याचवेळी कडाक्याच्या उन्हात लिंबाच्या दरात वाढ झाल्याने लोकांनी लिंबाची खरेदी बंद केली आहे.
सध्या येथे एक लिंबू 10 ते 15 रुपयांना विक्री केले जात आहे, तर 60 ते 75 रुपये आणि 300 रुपयांना अडीचशे ग्रॅम लिंबू विकले जात आहे. त्यामुळे आता ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वादही होऊ लागले आहेत. ग्राहक कमी पैसे देऊन लिंबू घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दोघात वाद होत आहेत. शहरात याठिकाणी भाजीपाला विक्री करणारे दुकानदारांना हातात काठी घेऊन लिंबाचे संरक्षण करण्यास भाग पडले आहे. विक्रेते म्हणतात की लोक भाजी घेण्यासाठी येतात आणि कधीकधी कमी पैशात जबरदस्तीने लिंबू घेण्याचा प्रयत्न करतात.
कडाक्याच्या उन्हात लिंबाच्या दरात वाढ झाल्याने हैराण झालेल्या लोकांनी आता लिंबू खरेदी बंद केल्याचे सांगतात. लोक म्हणतात, की तुम्ही लिंबाचे भाव इतके वाढले आहेत की लिंबू खरेदी करणे आता शक्य होत नाही. कारण, लोकांचे उत्पन्न मर्यादित असले तरी महागाई वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच (Petrol Diesel Price) लिंबू आणि इतर भाज्यांचे भाव वाढल्याचे लोकांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत आपल्या लोकांचे बजेट (Budget) कसे चालणार, ही विचार करण्याची गोष्ट आहे.
उन्हाळ्यात लिंबाने दिलाय झटका..! ‘त्यामुळे’ लिंबाचा पडलाय दुष्काळ, वाढलेत भाव; जाणून घ्या..