Bar Code vs QR Code : एकसमान दिसत असले तरी QR कोड आणि बार कोडमध्ये असतो खूप फरक? कसे ते जाणून घ्या

Bar Code vs QR Code : जवळपास सर्वच वस्तूंवर तुम्ही एक कोड पाहत असाल. काही ठिकाणी तुम्ही QR कोड आणि बार कोड पाहिला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? की QR कोड आणि बार कोडमध्ये खूप अंतर असते. जरी हे दिसायला सारखे असले तरी त्यांचे काम वेगळे असते.

पण QR कोड आणि बार कोडमध्ये काय फरक आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? विशेष म्हणजे अनेकजण या दोघांना समान मानतात. पण या दोघांमध्ये खूप फरक आहे. कसे ते जाणून घ्या सविस्तर.

काय आहे QR कोड ?

सर्वात अगोदर QR कोड म्हणजे काय ते जाणून घेऊयात. QR कोडला दुसऱ्या शब्दांत क्विक रिस्पॉन्स असेही म्हटले जाते. साधारणपणे ही बार कोडची प्रगत आवृत्ती मानली जात असून ते चौकोनी आकारात असते. यात बार कोडच्या तुलनेत बरीच माहिती एकाच वेळी साठवण्यात येते.

कुठे केला जातो वापर? : हे पेमेंट करण्यासाठी वापरण्यात येते.

बार कोड

हे लक्षात घ्या की हे QR कोडच्या तुलनेत कमी माहिती साठवू शकते. पण ही पद्धत वर्षानुवर्षे सुरू असून हे 1974 मध्ये सुरू झाले होते, ते व्यावसायिक कामाच्या उद्देशाने आणले गेले होते, हे लक्षात घ्या. बार कोड ऑप्टिकल उपकरणाद्वारे वाचता येतात आणि बार कोड समांतर रेषांनी बनलेला असतो. या ओळी त्याची प्रमुख ओळख आहेत.

कुठे केला जातो वापर? : बार कोड कोणत्याही वस्तूची माहिती साठवण्यासाठी वापरण्यात येतो. हे सहसा उत्पादनांवर आपल्याला पाहायला मिळते.

Leave a Comment