Banking News : तीन महिन्यांच्या कालावधीत येस बँकेचा (Yes Bank) निव्वळ नफा (Net profit) वार्षिक ३२.२ टक्क्यांनी घसरून १५२.८ कोटी रुपयांवर आला आहे. २२ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या तिमाहीच्या (Quarter )स्वतंत्र आर्थिक निकालांनुसार (Financial results), मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील निव्वळ नफा (Net profit) २२५.५० कोटी रुपये होता. वर्षभरातील झालेल्या पडझडी व्यतिरिक्त, गेल्या तिमाहीच्या तुलनेत निव्वळ नफा देखील कमी झाला आहे. आर्थिक वर्ष एफवाय २३ (Fiscal year – FY23) च्या पहिल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ३१०.६३ कोटी रुपये होता.
- Sanvat 2079 : या वर्षात भारतीय शेअर बाजार सगळ्यांना टाकणार मागे
- IDBI Bank Privatization : अजून एका बँकेचे होणार खाजगीकरण
- Canara bank finance बाबत घेतलाय ‘तो’ महत्वाचा निर्णय; पहा काय होणार परिणाम
- Reliance Jio : रिलायन्स जिओच्या या कंपनीचा नफा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
- Share Market Updates : संवत २०७८ मध्ये, सेन्सेक्स १ तर निफ्टी५० (Nifty 50) २ टक्क्यांनी घसरला
वित्तीय वर्ष (fiscal year) २३ च्या Q2 (second quarter Q2) मधील एकूण उत्पन्न मात्र ६३९४.११ कोटी रुपये इतके जास्त होते, जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत ५४३०.३० कोटी रुपये होते, असे येस बँकेने (Yes Bank) नियामक फाइलिंगमध्ये (Regulatory Filings) म्हटले आहे. निव्वळ व्याज उत्पन्न (Net interest income) गेल्या वर्षीच्या रु. १५१२.२ कोटींच्या तुलनेत ३१.७ इअर ऑन इअरने (YoY) वाढून १९९१.४ कोटी रुपये झाले. कर्जदात्याने त्याच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत देखील सुधारणा केली आणि ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत एकूण खराब कर्ज (Non-Performing Assets) १२.८९ टक्क्यांपर्यंत खाली आणले, जे सप्टेंबर २०२१ च्या अखेरीस १४.९७ टक्के होते.
त्याचप्रमाणे, निव्वळ एनपीए (NPA) ५.५५ टक्क्यांवरून ३.६० टक्क्यांवर आला. तथापि, बुडीत कर्जे (Bad debts) आणि आकस्मिक परिस्थितींसाठीच्या तरतुदी Q2FY23 साठी ३७७.३७ कोटी रुपयांवरून Q2FY22 साठी बाजूला ठेवलेल्या ५८२.८१ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या. भारतीय स्पर्धा आयोगाने (Competition Commission of India) ८९०० कोटी रुपयांच्या कराराला मंजुरी दिल्यानंतर दोन दिवसांनी येस बँकेने त्रैमासिक निकाल जाहीर केले ज्यामुळे दोन संस्थांना कर्जदात्यामधील भागभांडवल खरेदी करता येईल.
येस बँकेचा (Yes bank) चालू खर्च (Operating Expences) या कालावधीत २३ % वाढून २,१२१ कोटी रुपये झाला आहे, जो मुख्यत्वे जास्त आयटी खर्च (Higher IT Expences), कर्मचार्यांची वाढ (employee increments) आणि विमा खर्च (insurance Expences) यामुळे चालतो, असे कर्जदात्याने माध्यमांना सांगितले आहे.
सध्या येस बँकेच्या (Yes Bank) एका शेअरची किंमत(Share price) एनएससीवर (NSE) १६.०५ रुपये सुरु आहे.