Banking News : आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे (Second Quarter) निकाल (Result) जाहीर झाले आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या (private sector banks) नफ्यात वर्षभरात ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेच्या निव्वळ व्याज (Net interest) उत्पन्नात २६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेच्या एनपीएमध्येही (NPA) चांगलीच घट झाली आहे. बँकेचा स्टँडअलोन नफा (Standalone Profit) सप्टेंबर २०२१ मध्ये ५,५११ कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत ७,५५८ कोटी रुपये होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (Net interest income) १४,७८७ कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षी ११६९० कोटी रुपये होते.
- Suzlon Energy : या कंपनीचा हक्क इश्यू झाला १.८ पटीने ओव्हरसबस्क्राइब
- Reliance Jio : रिलायन्स जिओच्या या कंपनीचा नफा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
- SEBI News ; म्हणून “त्या” कंपन्यांवर सेबीने घातली बंदी
- Samvat 2079 : या वर्षात भारतीय शेअर बाजार सगळ्यांना टाकStandalone Profitणार मागे
बँकेचा एकूण कर्ज पोर्टफोलिओ (Loan Portfolio) २३ टक्क्यांनी वाढला आहे. ठेवींमध्येही १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेच्या एकूण ठेवी १०.९ लाख कोटींवर पोहोचल्या आहेत. किरकोळ कर्ज विभाग (Department of Retail Loans) दरवर्षी २५ टक्क्यांनी वाढला आहे. किरकोळ कर्जाचा वाटा एकूण कर्जाच्या ५४ टक्के आहे. बँकेच्या बँकिंग व्यवसायात वार्षिक ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बँकेच्या मालमत्तेचा दर्जाही सुधारला आहे. एकूण एनपीएम (NPA) मध्ये २२ बेसिस पॉईंट्सची घट झाली असून ती ३.१९ टक्के आहे. दुसऱ्या तिमाहीत बँकेने ११०३ कोटींची कर्जे माफ केली आहेत.
आयसीआयसीआय या बँकेच्या (ICICI Bank) शेअरची किंमत (Share Price) सध्या ९०७.१५ सुरु आहे. सकारात्मक निकालानंतर (Positive result) या बँकेच्या शेअरमध्ये तेजी बघायला मिळू शकते.