नवी दिल्ली : देशातील व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) च्या प्रवर्तक आणि व्यवस्थापकांसाठी सहा महिन्यांचा व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केला आहे. AIMA ने एका निवेदनात म्हटले आहे की, विशेष उद्देश व्यवस्थापन कौशल्य कार्यक्रमाचा उद्देश नवीन अर्थव्यवस्थेसह MSME व्यापाऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता वाढ करणे आहे.
AIMA च्या 11 व्या MSME परिषदेत या अभ्यासक्रमास सुरुवात करण्याची घोषणा करण्यात आली. ही परिषद ऑनलाइन होत आहे. एआयएमएचे अध्यक्ष सी. के. रंगनाथन यांनी परिषदेला संबोधित करताना, कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने एमएसएमई क्षेत्राला दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले. ते म्हणाले, की एमएसएमईसाठी आपत्कालीन क्रेडिट सुविधा हमी योजनेने 13.5 लाख कंपन्यांना दिवाळखोर होण्यापासून संरक्षण दिले आहे आणि जवळपास दीड कोटी रोजगारांचेही रक्षण केले आहे.
दरम्यान, ऑनलाइन पेमेंट सोल्यूशन प्रदाता PayU ने छोट्या आणि मोठ्या व्यवसायांसाठी 25 हजार रुपयांची क्रेडिट सुविधा सुरू केली आहे. PayU शी संबंधित 3.5 लाख व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल. PayU ने तीन उत्पादने लाँच केली आहेत. PayU ची सोल्यूशन्स SMB साठी 25 हजार रुपयांपासून ते कोट्यावधी रुपयांपर्यंतची क्रेडिट रक्कम ऑफर करतात. त्यांची परतफेड 1 आठवड्यापासून 1 वर्षात केली जाऊ शकते. PayU चे नवीन वैशिष्ट्य व्यापाऱ्यांना व्यवहाराच्या वेळेपासून 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत निधी मिळवण्याची परवानगी देते. हे ट्रॅव्हल आणि कॅब एग्रीगेटर, वित्तीय सेवा यांसारख्या व्यवसायांना मदत करते.
दरम्यान, असंघटीत क्षेत्रातील स्वयंरोजगार करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांनाही पेन्शन मिळत नाही. मात्र, आता या लोकांच्या बाबतीत आता सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या लहान व्यापाऱ्यांनाही सरकारच्या पेन्शन योजनेत सहभागी होता येणार आहे. या स्वयंरोजगार करणाऱ्या आणि लहान व्यापाऱ्यांनाही आता पेन्शन मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या कामगार कल्याण महासंचालनालय (DGLW), भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सामाजिक सुरक्षा संस्थेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ही माहिती काही दिवसांपूर्वी उपलब्ध करुन दिली होती.