Bank Rule : चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? लगेचच करा हे काम, खात्यात येतील पैसे

Bank Rule : अनेकदा आपल्याकडून चुकीच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. अशावेळी आपण काय करावे, हे समजत नाही. जर तुमचेही चुकीच्या बँक खात्यात पैसे गेले असतील तर काळजी करू नका. तुम्हाला ते लगेचच परत मिळतील.

समजा चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असल्यास सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या बँकेच्या होम ब्रँचशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती द्यावी लागणार आहे. त्या बदल्यात, तुम्हाला बँकेकडून विनंती क्रमांक आणि तक्रार क्रमांक मिळेल. तुम्हाला कस्टमर केअर नंबरवर कॉल करून या प्रकरणाची माहिती देता येईल.

असे मिळवा पैसे परत

जर पैसे अस्तित्वात नसणार्या खात्यात गेले असतील, तर पैसे लगेच तुमच्या खात्यात परत केले जातात. समजा पैसे एखाद्या खात्यात गेले आहेत जे पूर्णपणे वैध आहे. अशा वेळी चुकीच्या व्यवहाराची संपूर्ण जबाबदारी तुमची असते.

एसबीआयने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, समजा तुम्ही ज्या खात्यावर पैसे पाठवत आहात त्याच्या तपशीलांची पडताळणी करणे ही तुमची जबाबदारी असते. हे लक्षात घ्या की होम ब्रँच तुम्हाला फक्त पैसे मिळवण्यात मदत करू शकते, पण ती कोणतीही जबाबदारी घेणार नाही.

काळजी घ्या

हे लक्षात घ्या की डिजिटल व्यवहार करताना आपण नेहमी सावधगिरी बाळगावी आणि व्यवहारासाठी पिन टाकण्यापूर्वी एकदा संपूर्ण तपशीलाची पडताळणी करावी. तपशिलांची पडताळणी करत असताना तुमचा खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचे नाव इत्यादी तपशीलांशी नेहमी जुळावे. समजा तुम्ही UPI ॲपद्वारे पैसे पाठवत असाल तर एकदा मोबाईल नंबरची पडताळणी करून घ्या.

Leave a Comment