Bank Rule : जवळपास प्रत्येकाचे बँकेत खाते असते. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी काही खास सुविधा सुरु करत असते. ज्याचा ग्राहकांना फायदा होतो. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बदल होत असतात. ICICI बँकेने या महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
ICICI बँकेने केले शुल्क सुधारित
- डेबिट कार्ड वार्षिक शुल्क – वार्षिक 200 रुपये, ग्रामीण भागात वार्षिक 99 रुपये
- चेक बुक – शून्य शुल्क याचाच अर्थ असा की एका वर्षात 25 चेकबुकसाठी कोणतेही शुल्क नसेल आणि त्यानंतर प्रत्येक चेकसाठी ४ रुपये भरावे लागणार आहेत.
- डीडी/पीओ – रद्द करणे, डुप्लिकेट, पुनर्वैधीकरणासाठी रुपये 100 भरावे लागणार आहेत.
- IMPS – जावक: रु. 1,000 पर्यंतच्या रकमेसाठी, प्रत्येक व्यवहारासाठी रु. 2.50, रु. 1,000 ते रु. 25,000 – रु. 5 प्रति व्यवहार, रु. 25,000 ते रु. 5 लाख – रु. 15 प्रति व्यवहार आकारण्यात येणार आहेत.
- खाते बंद करणे – कोणताही शुल्क नसेल.
- डेबिट कार्ड पिन रीजनरेशन चार्ज – कोणताही शुल्क नसेल.
- डेबिट कार्ड डी-हॉटलिस्टिंग – कोणताही शुल्क नसेल.
- जुन्या व्यवहारांशी संबंधित दस्तऐवज पुनर्प्राप्त करण्यासाठी किंवा जुन्या नोंदींशी संबंधित प्रश्न – कोणताही शुल्क नसेल.
- स्वाक्षरी पडताळणी किंवा प्रमाणीकरण: प्रति व्यवहार 100 रुपये
- शिल्लक प्रमाणपत्र, व्याज प्रमाणपत्र – कोणताही शुल्क नसेल.
- पत्ता पडताळणी – कोणताही शुल्क नसेल.
- ECS/NACH डेबिट रिटर्न: आर्थिक कारणांसाठी प्रत्येकी 500 रुपये.
- नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (एनएसीएच), वन टाइम ऑथोरायझेशन चार्ज – कोणताही शुल्क नसेल.
- इंटरनेट यूजर आयडी किंवा पासवर्ड (शाखा किंवा नॉन आयव्हीआर ग्राहक क्रमांक) – कोणताही शुल्क नसेल.
- शाखेत पत्ता बदलण्याची विनंती – कोणताही शुल्क नसेल.
- बचत खात्याचे चिन्हांकित किंवा अचिन्हांकित करणे – कोणताही शुल्क नसेल.
- स्टॉप पेमेंट चार्ज – चेकसाठी 100 रुपये