Bank Recruitment 2024 । सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी, ‘इतक्या’ जागांसाठी मागवले अर्ज; जाणून घ्या

Bank Recruitment 2024 । जर तुम्ही बँकेत नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे अप्रेंटिसशिपच्या 3000 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. हे लक्षात घ्या की भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील पदवीधर असावे. तसेच उमेदवारांकडे 31 मार्च 2020 नंतर पदवी उत्तीर्ण झाल्याचे देखील प्रमाणपत्र असावे लागते. त्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही.

अशी होईल निवड

अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.

किती असेल पगार?

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15 हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 800 रुपये शुल्क तर, SC, ST EWS प्रवर्गासाठी 600 रुपये शुल्क निश्चित केले आहे. तसेच PH श्रेणीतील उमेदवारांना 400 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. सर्व महिला उमेदवारांना अर्ज फी म्हणून 600 रुपये भरावे लागतील.

असा करा अर्ज

स्टेप 1: भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना सर्वात अगोदर अधिकृत वेबसाइट nats.education.gov.in ला भेट दयावी लागणार आहे.
स्टेप 2: उमेदवारांना मुख्यपृष्ठावरील संबंधित लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी लागणार आहे.
स्टेप 3: आता उमेदवारांना अर्ज करा बटणावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 4: नंतर आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
स्टेप 5: पुढे अर्ज फी भरून घ्या.
स्टेप 6: त्यानंतर अर्ज सबमिट करा.
स्टेप 7: सर्वात शेवटी, उमेदवारांनी अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट काढून घ्यावी.

Leave a Comment