Bank Jobs 2024 । पंजाब नॅशनल बँकेमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी भरती सुरू आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आजची अंतिम मुदत असणार आहे. अर्जासाठी तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेच्या pnbindia.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
हे लक्षात घ्या की 7 फेब्रुवारीपासून अर्ज खुले असून आणि आज लिंक बंद होणार आहे. म्हणजेच तुम्हाला उद्या अर्ज करता येणार नाही. तुमच्याकडे आता बँकेत नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. याद्वारे एकूण 1025 पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.
या पदांसाठी फॉर्म भरायचा आहे किंवा त्यांच्याबद्दल तपशील जाणून घ्यायचा असल्यास दोन्ही कामांसाठी, तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, ज्याचा पत्ता आहे – pnbindia.in.
जाणून घ्या वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 21 ते 38 वर्षे असून ती शैक्षणिक पात्रता पदानुसार बदलत असते. त्याचे तपशील जाणून घेण्यासाठी, वेबसाइटवर दिलेली सूचना तुम्हाला पाहावी लागणार आहे.
अशी पार पडेल प्रक्रिया
PNB च्या SO रिक्त पदासाठी निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. हे लक्षात घ्या की परीक्षेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, त्यामुळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी वेळोवेळी वेबसाइट तपासत राहावी लागेल.
अर्ज फी
अर्ज फी बद्दल बोलायचे झाले तर SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क 59 रुपये आहे आणि इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी ती 1180 रुपये आहे. स्क्रीनवर विचारलेली माहिती देऊन डेबिट कार्ड (रुपे/व्हिसा/मास्टर कार्ड), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड/मोबाइल वॉलेट किंवा UPI वापरून पेमेंट करता येईल. अधिक संबंधित तपशीलांसाठी तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.