Bank IPO: मुंबई : तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्यास तयार असल्यास (ready to invest in IPO) ही तुमच्या मोठी कामाची बातमी आहे. कारण तामिळनाड मर्कंटाइल बँकेचा IPO आजपासून (दि. 5 सप्टेंबर 2022) खुला (Tamilnad Mercantile Bank has opened for subscription) झाला आहे. खाजगी क्षेत्रातील या बँकेने IPO प्राइस बँड 500-525 रुपये प्रति शेअर निश्चित केला असून गुंतवणूकदारांकडे फक्त तीन दिवस आहेत. कारण या IPO ची सदस्यता 7 सप्टेंबर 2022 पर्यंत बंद होणार आहे.

कोणताही गुंतवणूकदार त्याच्या डिमॅट खात्यातून 7 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतो. कंपनीने IPO चा लॉट साइज 28 शेअर्स म्हणून निश्चित केला आहे. म्हणजेच तुम्हाला 14700 रुपयांसह IPO साठी अर्ज करावा लागेल. बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार हा IPO 832 कोटी रुपयांचा आहे. तामिळनाड मर्कंटाइल बँक 1.58 कोटी नवीन शेअर जारी करणार आहे. ही देशातील सर्वात जुन्या खाजगी बँकांमध्ये (oldest private banks in the country) गणली जाते. तमिळनाड मर्कंटाइल बँक प्रामुख्याने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), कृषी आणि किरकोळ ग्राहकांना बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदान करते. (banking and financial services to Micro, Small and Medium Enterprises (MSMEs), agriculture and retail customers) या बँकेचा इतिहास 100 वर्षांचा आहे. सन 1921 मध्ये नादर बँकेच्या नावाने त्याची सुरुवात झाली. सध्या बँकेच्या 509 शाखा कार्यरत आहेत. शाखांपैकी 369 शाखा तामिळनाडूमध्ये आहेत. तामिळनाडू मर्कंटाइल बँकेच्या व्यवसायात तामिळनाडूमधील शाखांचा वाटा 70 टक्क्यांहून अधिक आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये बँकेचे निव्वळ उत्पन्न 8212 कोटी रुपये होते.

तामिळनाड मर्कंटाइल बँकेने असे म्हटले आहे की IPO मधून उभारलेले पैसे बँकेचे मूळ भांडवल वाढवण्यासाठी आणि भविष्यातील भांडवली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरले जाईल. कंपनीने म्हटले आहे की IPO मधून मिळालेले पैसे इतर राज्यांमध्ये शाखा उघडण्यासाठी देखील वापरले जातील. (Bank has stated that the money raised from the IPO reason will be used by the bank to increase its core capital and meet future capital requirements open branches in other states) कोणत्याही IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याकडे स्थूलमानाने पाहिले तर बहुतेक संशोधन संस्था आणि ब्रोकरेज हाऊसेस बँकेच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. तमिळनाड मर्कंटाइल बँकेची गेल्या आर्थिक वर्षातील चांगली कामगिरी यामागचे कारण जवळपास सर्वच तज्ञ सांगत आहेत. या बँकेचा निव्वळ NPA 1% पेक्षा कमी आहे आणि बँकेचे उत्पन्न सतत वाढत आहे. दीर्घकालीन दृष्टिकोन असणाऱ्यांसाठी ही गुंतवणूक योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Before investing in any IPO, it is important to know the opinion of experts. Experts say that this investment is right for those with a long-term outlook)

Share.

Leave A Reply

Exit mobile version