Bank Holidays: मुंबई (Mumbai): ऑक्टोबर महिना सुरू होतानाच आता सगळ्यांना दसरा-दिवाळीचे वेध लागले आहेट. या महिन्यात दुर्गा पूजा, गांधी जयंती, दिवाळी, भाईदूज आणि छठपूजा (Durga Puja, Gandhi Jayanti, Diwali, Bhai Dooj and Chhath Puja) असे अनेक महत्त्वाचे सण आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालये आणि बँका यांनाही सुट्ट्या आहेत. परिणामी अनेक ग्राहक आणि व्यावसायिकांची अडचण होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार चालू महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. सुट्ट्यांमध्ये महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार अशा नियमित सुट्ट्यांचाही समावेश असेल.
- Must Read :
- Business : पावसाळ्यात सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल चांगल्या उत्पन्नाची हमी; जाणून घ्या..
- MSME business बाबत झालीय महत्वाची घोषणा; पहा एफएम सितरामन यांनी काय म्हटलेय
या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. RBI (Bank Holidays List 2022) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी सूचनांवर देखील अवलंबून असतात. सुट्ट्यांची संपूर्ण यादी पहा – (ऑक्टोबर 2022 मधील बँक सुट्ट्यांची यादी) :
- 1 ऑक्टोबर – सहामाही बंद – सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
- 2 ऑक्टोबर – गांधी जयंती
- 3 ऑक्टोबर – सिक्कीम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, केरळ, बिहार आणि मणिपूरमध्ये दुर्गापूजेच्या (महाअष्टमी) निमित्त बँका बंद राहतील.
- 4 ऑक्टोबर – दुर्गापूजा (दसरा)/ शंकरदेवाच्या जयंतीनिमित्त कर्नाटक, ओरिसा, सिक्कीम, केरळ, बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, आसाम, बिहार आणि मेघालय या राज्यांतील बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल.
- 5 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (दशमी)/शंकर देव जन्मोत्सवानिमित्त मणिपूर वगळता देशभरातील बँका बंद राहतील.
- 6 ऑक्टोबर – गंगटोकमध्ये दुर्गापूजेमुळे बँका बंद राहतील.
- 7 ऑक्टोबर – गंगटोकमध्ये दुर्गापूजेमुळे बँका बंद राहतील.
- 13 ऑक्टोबर – करवा चौथमुळे बँका बंद राहणार आहेत.
- 14 ऑक्टोबर – जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
- 18 ऑक्टोबर – गुवाहाटीमध्ये काटी बिहूनिमित्त बँका बंद राहतील.
- 24 ऑक्टोबर – काली पूजा/नरक चतुर्दशी/दिवाळी/लक्ष्मी पूजेनिमित्त हैदराबाद, इंफाळ आणि गंगटोक वगळता देशातील इतर शहरांमध्ये बँका बंद राहतील.
- 25 ऑक्टोबर – गंगटोक, हैदराबाद, इंफाळ आणि जयपूरमध्ये लक्ष्मीपूजन/दिवाळी/गोवर्धन पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
- 26 ऑक्टोबर – अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, डेहराडून, गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, शिलाँग आणि शिमला येथे भाई दूज सारख्या सणानिमित्त बँका बंद राहतील.
- 27 ऑक्टोबर – लखनौ, कानपूर, इंफाळ आणि गंगटोकमध्ये भाई दूज/चित्रगुप्त सारख्या सणांमुळे बँका बंद राहतील.
- 28 ऑक्टोबर – अहमदाबाद, पाटणा आणि रांची येथील बँका दाला छठ/सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त बंद राहतील.
- ऑक्टोबर महिन्यात साप्ताहिक सुट्टी
- 8 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबरला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. त्याचबरोबर 2, 9, 16, 23 आणि 30 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने बँक कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी असेल.