नवी दिल्ली : आता थोड्याच दिवसात नवीन वर्ष सुरू होणार आहे. या नव्या वर्षात अनेक महत्वाचे बदल होणार आहेत. तसेच या वर्षातील पहिल्या महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी राहणार आहे, याची माहिती मिळाली आहे. रिजर्व बँकेने जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे नव्या वर्षात बँकेच्या कामकाजाचे नियोजन करताना बँक कोणत्या दिवशी बंद राहणार, याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे ठरणार आहे. चला तर मग, जानेवारी महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार आहेत, हे माहित करून घेऊ..
जानेवारी महिन्यात बँकांना भरपूर दिवस सुट्ट्या आहेत. या महिन्यात देशातील बँका 14 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये 4 सुट्ट्या रविवारच्या आहेत. देशातील बँका काही एकाच दिवशी बंद नसतील, राज्यानुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असणार आहेत. यामध्ये अनेक स्थानिक सुट्ट्या आहेत.
रिजर्व बँकेच्या आधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या यादीनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यातील आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होत नाहीत. बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील आणि कुठे सुरू राहतील, याचीही माहिती बँकेने दिली आहे. त्यानुसार, तुम्ही बँकेच्या कामकाजाचे नियोजन करणे गरजेचे आहे.
1 जानेवारी रोजी शनिवारी नव्या वर्षाचा पहिला दिवस असल्याने बँका बंद असतील. 2 जानेवारी रोजी रविवारची सुटी आहे. 3 आणि 4 जानेवारी रोजी सिक्कीममधील नववर्षानिमित्त तेथील बँका बंद राहतील. 9 जानेवारी रोजी रविवार आहे. 11 जानेवारीला मिझोराम राज्यातील बँका बंद असतील. 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी राहिल.
14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीनिमित्त अनेक राज्यात बँका बंद आहेत. 15 जानेवारीला आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पाँडेचेरी राज्यात बँकांना सुट्टी आहे. 16 आणि 23 जानेवारीला रविवार आहे. 25 जानेवारी रोजी हिमाचल प्रदेश राज्यातील बँकांना सुट्टी आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर 31 जानेवारी रोजी आसाम राज्यातील बँका बंद असतील.
नव्या वर्षात एटीएममधून पैसे काढणे ठरणार खर्चिक; जाणून घ्या, रिजर्व बँकेने कोणते नियम बदलले