Bank Holidays in April: येत्या काही दिवसात एप्रिल महिना सुरु होणार आहे. या एप्रिल महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने दिली आहे.
ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँकेने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामुळे जर तुमचा बँकेत एप्रिल महिन्यात काही काम असेल तर तुम्ही एकदा सुट्यांची यादी तपास नाहीतर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल.
आरबीआयच्या मासिक सुट्ट्यांच्या यादीनुसार, एप्रिलमध्ये बँका 14 दिवस बंद राहतील, एप्रिलमध्ये फक्त 16 दिवस काम केले जाईल. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. याशिवाय ईद, रामनवमी आदी सणांमुळे अनेक राज्यांतील बँकांना सुट्टी असेल.
चुकूनही अविवाहित मुलींनी ‘या’ 5 गोष्टी करू नये, नाहीतर होणार …..
बँका केव्हा आणि कुठे बंद राहतील
आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद – आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, इंफाळ, इटानगर, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोहिमा, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी पाटणा, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरममध्ये 1 एप्रिलला बँक सुट्टी असेल.
5 एप्रिल 2024 रोजी तेलंगणा, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बाबू जगजीवन राम यांचा वाढदिवस आणि जुमात जुमातुल विदा या दिवशी बँका बंद राहतील.
7 एप्रिल 2024 रोजी रविवार असल्यामुळे देशभरात बँका बंद राहतील. बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढीपाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष आणि पहिल्या नवरात्रीमुळे 9 एप्रिल 2024 रोजी बँका बंद राहतील.
10 एप्रिल 2024 रोजी ईदच्या निमित्ताने कोची आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.
11 एप्रिल 2024 रोजी ईदच्या दिवशी देशभरात बँका बंद राहतील.
13 एप्रिल 2024 रोजी दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
रविवार असल्यामुळे 14 एप्रिल 2024 रोजी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
हिमाचल दिनानिमित्त 15 एप्रिल 2024 रोजी गुवाहाटी आणि शिमला झोनमध्ये बँका बंद राहतील.
17 एप्रिल 2024 रोजी श्री रामनवमी निमित्त अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूर येथे बँक सुट्टी असेल.
आगरतळा येथे 20 एप्रिल 2024 रोजी गरिया पूजेमुळे बँकेला सुट्टी असेल.
रविवार असल्यामुळे 21 एप्रिल 2024 रोजी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
अखेर, महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, जाणून घ्या कोणाच्या खात्यात कोणती जागा ?
27 एप्रिल 2024 रोजी चौथा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी असेल.
रविवार असल्यामुळे 28 एप्रिल 2024 रोजी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.