Bank Holidays: ग्राहकांना लक्ष द्या! मार्चमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद, कारण जाणुन घ्या

Bank Holidays: आजपासून मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे या महिन्यात जर तुमचा काही बँकेमध्ये काम असेल तर तुम्ही ते काम लवकरात लवकर निपटून घ्या नाहीतर तुमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वात मोठी बँक आरबीआयने मार्च महिन्यात तब्बल बँका 14 दिवस बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये येणाऱ्या  सणांच्या सुट्यांव्यतिरिक्त, यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.

मात्र या 14 दिवसात ऑनलाइन सेवा सुरू राहणार आहे. मार्चमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील आरबीआयने मार्च महिन्याची बँक सुट्टीची यादी जाहीर केली आहे. या अंतर्गत मार्चमध्ये महाशिवरात्री, होळी, गुड फ्रायडे आणि शनिवार, रविवार या सुट्ट्यांमुळे एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत.

हे जाणुन घ्या, वेगवेगळ्या राज्यांनुसार या सुट्ट्या ठरवल्या जातात. सरकारी आणि सणांव्यतिरिक्त बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात, तर दर रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी असते.

मार्च 2024 मध्ये बँकेला सुट्ट्या कधी असतील?

01 मार्च 2024- चापचार कुटमुळे आयझॉलमध्ये बँकेला सुट्टी.

03 मार्च 2024- रविवार 08 मार्च 2024- अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, चंदीगड, डेहराडून, कोची, लखनौ, मुंबई भोपाळ, भुवनेश्वर, हैदराबाद, जम्मू, कानपूर, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि त्रिवेंद्रम येथे महा शिवरात्री/शिवरात्रीमुळे बँका बंद.

09 मार्च 2024- दुसरा शनिवार

10 मार्च 2024- रविवार

17 मार्च 2024- रविवार

22 मार्च 2024- बिहार दिनानिमित्त पाटण्यात बँका बंद.

23 मार्च 2024- चौथा शनिवार

24 मार्च 2024- रविवार

25 मार्च 2024- होळीमुळे बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोहिमा, पाटणा, श्रीनगर आणि त्रिवेंद्रम वगळता देशभरात बँक सुट्टी.

26 मार्च 2024- भोपाळ, इंफाळ, पाटणा येथे होळी किंवा याओसांग दिवसामुळे बँका बंद.

27 मार्च 2024- होळीमुळे पाटण्यात बँका बंद.

29 मार्च 2024- गुड फ्रायडेमुळे आगरतळा, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, शिमला आणि श्रीनगर वगळता संपूर्ण देशात बँक सुट्टी.

तुम्ही या ऑनलाइन सेवांची मदत घेऊ शकता

बँक सुट्ट्यांमध्ये ग्राहक ऑनलाइन सेवा वापरू शकतात, कारण UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांवर बँक सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होत नाही.

पैसे UPI द्वारे देखील हस्तांतरित केले जाऊ शकतात, तर तुम्ही पैसे काढण्यासाठी ATM वापरू शकता. तुम्ही तुमचे काम नेट बँकिंग, एटीएम, डिजिटल पेमेंटद्वारेही करू शकता. तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील सहज वापरू शकता. तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.

RBI बँकेच्या सुट्ट्यांना तीन श्रेणींमध्ये विभागते, ज्यात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत सुट्ट्या, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत सुट्ट्या आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक क्लोजिंग ऑफ अकाउंट्स यांचा समावेश होतो.

Leave a Comment