मुंबई : वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर आजपासून सुरू झाला आहे. डिसेंबर 2022 मध्ये बँकांमध्ये 13 दिवस सुट्टी असेल. डिसेंबर महिन्यात चार रविवार असल्याने या दिवशी बँकेला साप्ताहिक सुट्टी असेल तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद राहतील. याशिवाय काही सण आणि विशेष दिवसांमुळे बँकांमध्ये कामकाज होणार नाही. या महिन्यात कोणत्याही दिवशी बँकेच्या शाखेत जाण्याचा तुमचा हेतू असेल, तर प्रथम सुट्ट्यांची यादी तपासा. असे होऊ नये की ज्या दिवशी तुम्ही बँकेत जाल त्या दिवशी बँक बंद असेल.
रिजर्व्ह बँक प्रत्येक वर्षासाठी बँक सुट्ट्यांची यादी तयार करते. विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये संपूर्ण देशातील बँका 13 दिवस एकाच दिवशी बंद राहणार नाहीत. आरबीआयने सुट्ट्यांची जी यादी जारी केली आहे, त्यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय आहेत, तर काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील आहेत. त्या दिवशी बँकांच्या शाखा संबंधित राज्यांमध्येच बंद राहतील.
सध्या बँकांच्या बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. यामुळेच आता बँक बंद असतानाही मनी ट्रान्सफरसह अनेक गोष्टी करता येतात. पण, आताही अशी काही कामे आहेत जी केवळ बँकेच्या शाखेत जाऊन केली जातात. त्यामुळे बँक बंद असताना अनेक ग्राहकांची काही महत्त्वाची कामे रखडतात. म्हणूनच प्रत्येक बँकेच्या ग्राहकाने बँकेच्या सुट्ट्यांची माहिती घेत राहावी जेणेकरुन त्याला बँकिंगचे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते सुट्टीच्या दिवसापूर्वी ते हाताळू शकतील.
3 डिसेंबर : (शनिवार) : गोव्यात बँक बंद.
4 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी.
10 डिसेंबर (शनिवार): दुसरा शनिवार – देशभरातील बँका बंद राहतील.
11 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी आहे.
12 डिसेंबर (सोमवार): मेघालयमध्ये बँक बंद.
18 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी आहे.
19 डिसेंबर (सोमवार): गोवा मुक्ती दिन- गोव्यात बँक बंद.
24 डिसेंबर (शनिवार): चौथा शनिवार- देशभरातील बँका बंद.
25 डिसेंबर (रविवार): देशभरात सुट्टी आहे.
26 डिसेंबर (सोमवार): नाताळमध्ये बँक बंद, लासुंग, नामसंग- मिझोराम, सिक्कीम, मेघालय.
29 डिसेंबर (गुरुवार): चंदीगडमध्ये बँका बंद राहणार आहेत.
30 डिसेंबर (शुक्रवार): मेघालयातील बँक बंद.
31 डिसेंबर (शनिवार): मिझोरममध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बँक बंद.
- Must Read : महिन्याच्या सुरुवातीलाच बदलणार ‘हे’ नियम; जाणून घ्या, तुमच्यासाठीही आहे महत्वाचे
- Bank Complaint to RBI: अशी करा बँकेची तक्रार; लगोलग होणार अधिकाऱ्यांवर कारवाई