Bank FD: आजचे काळात बँक एफडी गुंतवणुकीसाठी सर्वात भारी पर्याय मानला जातो. त्यामुळे तुम्ही देखील बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर AU Small Finance Bank ही FD वर सर्वाधिक व्याजदर देणार्या बँकांपैकी एक आहे.
पुन्हा एकदा या बँकेने 2 कोटींपेक्षा कमी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. ग्राहकांना 8% पर्यंत व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना अधिक फायदा होईल. नवे दरही लागू झाले आहेत. AU स्मॉल फायनान्स बँकेने देशांतर्गत आणि NRE/NRO किरकोळ एफडी दोन्हीवरील व्याजदर सुधारित केले आहेत.
सर्वाधिक व्याज 24 महिने 1 दिवस ते 36 महिन्यांपर्यंतच्या घरगुती FD योजनांवर उपलब्ध आहे. सामान्य नागरिकांसाठी 8 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.50 टक्के दर आहेत. बँक ज्येष्ठ नागरिकांना 36 महिने 1 दिवस ते 45 महिने मुदत ठेवींवर 8.25 टक्के व्याज देत आहे, तर सामान्य नागरिकांसाठी नवीन दर 7.75 टक्के आहेत.
7 दिवस ते 1 महिना 15 दिवसांच्या घरगुती एफडीवर 3.75% व्याज आणि 1 महिना 16 दिवस ते 3 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 4.25% व्याज उपलब्ध आहे. 3 महिने 1 दिवस ते 6 महिने मुदत ठेवीवर 5%, 6 महिने 1 दिवस ते 12 महिने FD वर 6.75%, 12 महिने 1 दिवस ते 15 महिने FD वर 7.60%, 15 महिने 1 दिवस ते 18 7.75% व्याज आहे. 18 महिन्यांच्या FD वर आणि 1 दिवस ते 24 महिन्यांच्या FD वर 7.50% प्राप्त होत आहे. 60 महिने ते 120 महिने मुदत ठेवींसाठी आणि 45 महिने 1 दिवस ते 60 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD चे व्याज दर 7.20 टक्के आहेत.