Bank FD: जर तुम्ही एफडीच्या स्वरूपात तुमचे पैसे बँकेत गुंतवणूक करण्याचे विचार करत असाल तर तुम्हाला आम्ही सांगतो देशातील सध्या काही बँका दोन वर्षाच्या एफडीवर 8.5 टक्के व्याज देत आहेत ज्याचा तुम्ही फायदा घेत बंपर कमाई करू शकतात. चला मग जाणुन घ्या या बँकांबद्दल संपूर्ण माहिती
IndusInd Bank
ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 2 वर्षांच्या FD वर 8.25% व्याज देत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना 7.75 टक्के व्याज मिळत आहे.
DCB Bank
बँक सामान्य नागरिकांना 2 वर्षांच्या मुदत ठेवींवर 8 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 8.5 टक्के व्याज मिळत आहे.
Suryoday Small Finance Bank
ही बँक सध्या सामान्य नागरिकांना दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 8.25 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 8.75 टक्के व्याज मिळत आहे.
RBL Bank
ही बँक सध्या ज्येष्ठ नागरिकांना दोन वर्षांच्या एफडीवर 8 टक्के व्याज देत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी 7.50 टक्के व्याजदर आहे.
Utkarsh Small Finance Bank
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांना दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 8 टक्के व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.60 टक्के दर आहेत.