Bank FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अशा काही बँकाचे आहेत, ज्या आपल्या गुंतवणूकदारांना बँक एफडीवर सर्वात जास्त व्याज देत आहेत. ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.
सूर्योदय स्मॉल फायनान्स
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या मतानुसार, सध्या बँका सर्वसामान्यांना एफडीवर ४ टक्के ते ९.०१ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.५० टक्के ते ९.२५ टक्के व्याज देत असून हा व्याजदर सात दिवस ते 10 वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडीवर आहे, हे लक्षात ठेवा.
हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर दिला जात आहे. बँक 5 ते 25 कोटी रुपयांच्या स्लॅबमधील बचत खाते ग्राहकांना 7.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत असून 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस बँकेच्या एकूण ठेवी 4,697 कोटी रुपयांवरून 38 टक्क्यांनी वाढ होऊन 6,484 कोटी रुपये झाल्या आहेत.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या दरम्यान FD वर 3.60% ते 9.21% व्याज देत असून 750 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वाधिक 9.21% व्याज देण्यात येत आहे. हे दर 28 ऑक्टोबर 2023 पासून लागू आहेत.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 4.60% ते 9.10% व्याज देत असून दोन वर्षे ते तीन वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 9.10% व्याज दिले जात आहे. हे दर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू केले आहेत.
जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% आणि 9% पर्यंत व्याज देत असून 365 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वात जास्त 9% व्याजदर देण्यात येत आहे. एफडीचे दर 2 जानेवारी 2024 पासून लागू केले आहेत.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
हे लक्षात घ्या की इक्विटास स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांची FD ऑफर करत असून येथे 4% ते 9% पर्यंत व्याज दिले जात आहे. 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वात जास्त व्याज दर 9% आहे. ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याज मिळत आहे. हे दर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
ही बँक आपल्या ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीतील एफडीसाठी 4.50% ते 9.50% पर्यंत ऑफर करत आहे. 1001 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर जास्तीत जास्त 9% व्याज उपलब्ध आहे. हे दर 2 फेब्रुवारी 2024 पासून लागू केले आहेत.