Bank FD Rules । फक्त फायदेच नाही तर एफडीचे तोटेही आहेत, गुंतवणूक करण्यापूर्वी घ्या जाणून

Bank FD Rules । अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. जर तुम्हीही बँक एफडीमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला यामध्ये तोटा देखील सहन करावा लागेल. कसे ते जाणून घ्या.

मे २०२२ नंतर जेव्हा आरबीआयने रेपो दरात सतत वाढ करण्यास सुरुवात केली, त्यावेळी बँकांनीही एफडीचे दर खूप वाढवले. दोन वर्षांपूर्वी सुमारे सहा टक्के परतावा देणाऱ्या एफडीवर आता आठ टक्क्यांच्या वर व्याज दिले जात आहे.

गुंतवणुकीचा उत्तम पर्याय असून FD ला अनेक मर्यादा आहेत. यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे त्यात पैसे गुंतवण्यापूर्वी त्याचे तोटे काय आहेत हे जाणून घेतले पाहिजे.

कमी परतावा

एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा पहिला तोटा म्हणजे त्यातील व्याजदर निश्चित केलेला असतो. बँकेने दिलेले व्याज स्थिर राहते. तुम्हाला मिळणारे व्याज हे स्टॉक किंवा म्युच्युअल फंडासारख्या इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये मिळणाऱ्या व्याजापेक्षा खूप जास्त असते.

भरावा लागेल दंड

तुम्ही निर्धारित कालावधीपूर्वी तुमची FD काढली तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

तेजीचा लाभ मिळत नाही

मुदत ठेवींचा एक दोष म्हणजे योजनेचा कार्यकाळ संपेपर्यंत तुम्हाला स्थिर व्याजदर मिळतो. तुम्हाला त्या दराने शेवटपर्यंत व्याज मिळते. बाजार वाढला तरी तुमचा परतावा हमखास राहतो. यामध्ये अनेकदा नुकसान होण्याची दाट शक्यता असते.

मनी लॉक-इन-पीरियड

तुम्ही मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा तुमचे पैसे विशिष्ट कालावधीसाठी लॉक करण्यात येतात. बहुतेक मुदत ठेवी अशा असतात की तुम्ही त्या मध्यभागी तोडू शकत नाही आणि जर तुम्ही त्या मध्यभागी मोडली तर तुम्हाला खूप मोठा दंड भरावा लागतो.

यात फिक्स डिपॉझिटची मुदत संपेपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहीत. इमर्जन्सी असली तरी, गरज असताना तुमच्याकडे स्वतःचे पैसे नसतात.

कर आकारला जातो

तुम्हाला मुदत ठेवींवर मिळणाऱ्या एफडीवरील व्याजदरावर कर भरावा लागणार आहे. तसेच तुम्हाला जे काही व्याज मिळेल त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल.

Leave a Comment