Bank FD Rate: आज सर्वसामान्यांसाठी बँक एफडी बचतीसाठी सर्वात भारी पर्याय मानला जातो. आज देशातील लाखो लोक वेगवेगळ्या बँकेमध्ये एफडी स्वरूपात मोठी बचत करत आहे.
यातच आता ग्राहकांना जास्त नफा देण्याच्या उद्देशाने Yes Bank ने 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या FD योजनांवर उपलब्ध व्याजदरात बदल केला आहे. ही देशातील प्रमुख बँकांपैकी एक आहे. बँकेनेही नवे दर लागू केले आहेत.
येस बँक सध्या वेगवेगळ्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडी योजनांवर 3.75 टक्के ते 8.25 टक्के व्याज देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँक 7-14 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, 15-45 दिवसांच्या FD वर 3.70 टक्के व्याज मिळत आहे. 18 महिन्यांपासून ते 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज मिळत आहे. व्याजदर 8.25 टक्के आहे.
46 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.10 टक्के, 91 ते 180 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के, 181 ते 271 दिवसांच्या एफडीवर 6 टक्के आणि 271 ते 1 वर्षाच्या एफडीवर 6.25 टक्के व्याज बँकेकडून देण्यात येत आहे. ग्राहक. 36 ते 120 महिन्यांच्या FD वर 7% व्याज मिळेल. बँक 18 महिने ते 3 वर्षांच्या FD योजनेवर 6.75 टक्के व्याज आणि 1 वर्ष ते 18 महिन्यांच्या FD वर 7.50 टक्के व्याज देत आहे.