Bank FD Rate: बँक एफडी आज सर्वसामान्यांच्या बचतीसाठी खूपच फायदेशीर पर्याय मानला जातो. यामुळे आज अनेक जण बँक एफडीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे.
यातच तूम्ही देखील गुंतवणुकीसाठी बँक एफडीमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर देशातील दोन आघाडीच्या खासगी बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
बँक ऑफ इंडियाने 2 कोटींपेक्षा कमी एफडी योजनांसाठी व्याजदर वाढवले आहेत. त्याच वेळी, एचडीएफसीने बल्क एफडी म्हणजेच 2-5 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींवरील व्याजात वाढ केली आहे.
एचडीएफसी बँकेने एफडी व्याजदरात वाढ केली
बँकेने 27 मे पासून मे महिन्याचे दर लागू केले आहेत. किरकोळ FD व्याजदर फेब्रुवारी 2023 मध्ये शेवटचे वाढले होते. बल्क एफडीवर किमान व्याज दर 4.75 टक्के आणि कमाल 7.25 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांना कमाल 7.25% व्याज मिळत आहे. 1 वर्ष ते 15 महिन्यांच्या मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याज मिळत आहे.
बँक 2 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 7% व्याज देत आहे. त्याच वेळी, 15 महिने ते 2 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 7.05% व्याज मिळत आहे. 7 दिवस ते 29 दिवसांच्या FD साठी सर्वात कमी व्याजदर सामान्य ग्राहकांसाठी 4.75% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.25% आहेत.
- Onion Curry : कांद्याची टेस्टी भाजी कधी खाल्ली का? मग, ‘या’ रेसिपीने एकदा तरी ट्राय कराच
- घरीच तयार करा गरमागरम Vegetable Pasta; रेसिपीही आहे एकदम सोपी
- LIC Schemes : एकाच वेळेस करा पैसे जमा, होईल पेन्शनची सोय; LIC ची ‘ही’ स्कीम खासच
- Car Buying Tips : सेकंड हँड कार खरेदी करताय ? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
- हृदयविकाराचा धोका वाढवतो High Cholesterol; कंट्रोल करण्यसाठी ‘हे’ फूड खाणे टाळाच
बँक ऑफ इंडियाचे व्याजदर
बँक ऑफ इंडियानेही एफडी व्याजदरात वाढ केली आहे. 26 मे पासून नवीन दर लागू झाले आहेत. 2 कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल करण्यात आला आहे.
1 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वाधिक व्याज मिळत आहे, व्याज 7% पर्यंत वाढले आहे. 2 वर्षे ते 3 वर्षांच्या FD वर 6.75% व्याज आणि 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.50% व्याज उपलब्ध आहे.
बँक 5 वर्ष ते 8 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6% व्याज देत आहे आणि 8 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर. सर्वात कमी दर 7-14 दिवस, 15-30 दिवस आणि 31-45 दिवसांच्या FD वर उपलब्ध आहेत, तर नवीन दर 3% आहेत.