Bank FD : बँक एफडीमध्ये गुंतवणूक केलीय? RBI च्या निर्णयानंतर मिळणार सर्वाधिक व्याज

Bank FD : अनेकजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करत असतात. विविध बँका एफडीमधील गुंतवणुकीवर वेगवेगळे व्याज देत असतात. जर तुम्हीदेखील बँक एफडीमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता RBI च्या निर्णयानंतर बँक एफडीमध्ये सर्वात जास्त परतावा मिळवू शकता. कसे ते जाणून घेऊयात.

असे मिळेल जास्त व्याज

RBI च्या घोषित प्रस्तावानुसार, आता बँक मुदत ठेवी रुपये 3 कोटी आणि त्यावरील मोठ्या ठेवी मानल्या जाणार आहेत. हे लक्षात घ्या की सध्या, रु. 2 कोटी आणि त्यावरील बँक एफडी मोठ्या प्रमाणात एफडी मानल्या जात आहेत. त्याचा तोटा असा आहे की किरकोळ एफडीच्या तुलनेत बल्क एफडी कमी व्याजदर देत असून अशा वेळी मोठ्या प्रमाणात ठेव मर्यादा वाढवल्या तर, एफडी गुंतवणूकदार एफडीमध्ये जास्त पैसे गुंतवून जास्तीत जास्त व्याज मिळवू शकतात.

असा ठरवला जातो व्याजदर

त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ठरवणे हे सर्वस्वी बँकांवर अवलंबून असून यामुळेच बहुतांश बँकांमध्ये एफडीवरील व्याजदरही वेगवेगळे असतात. हे मुदत ठेवीचा कालावधी आणि गुंतवणूकदाराच्या वयावर अवलंबून असून या बँका सामान्यतः त्यांच्या गरजेनुसार आणि मालमत्ता-दायित्व व्यवस्थापन ठेवींवर वेगवेगळे व्याजदर देत असतात.

जाणून घ्या बँक एफडीचे फायदे

बँक एफडीमध्ये शेअर बाजारातील चढउताराचा परिणाम परताव्यावर होत नाही.
एफडीवरील व्याज सामान्य बचत खात्यांपेक्षा जास्त आहे.
तुमचे पैसे मुदत ठेवींमध्ये पूर्णपणे सुरक्षित राहत असते.
तुम्हाला FD वर कर्ज घेण्याची सुविधा मिळत असते.

Leave a Comment