Bank FD । ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता FD वर मिळणार 9% व्याज, पहा यादी

Bank FD । प्रत्येकाचे बँकेत खाते असते. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या दराने व्याज देत असते. जास्त व्याजदर देणाऱ्या बँकेत गुंतवणूक करण्यास अनेकजण प्राधान्य देतात. अशातच आता ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे, आता FD वर 9% व्याज देण्यात येत आहे.

स्मॉल फायनान्स बँका ग्राहकांना 8 ते 8.5 टक्के व्याज देत असल्याने आता तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बँकांचे व्याजदरही तपासून पाहू शकता. यामध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेपासून ते जना स्मॉल फायनान्स बँकेपर्यंत अनेक नावांचा या यादीत समावेश आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 4% ते 8.65% पर्यंत व्याज देत असून 2 वर्षे आणि 2 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर 8.65% दराने व्याज देण्यात येत आहे.

एयू स्मॉल फायनान्स बँक

AU Small Finance Bank 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 3.75% ते 8% दराने व्याज देत असून 18 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8% च्या विक्रमी दराने व्याज देत आहे. नवीन दर 24 जानेवारी 2024 पासून लागू आहेत.

ESAF स्मॉल फायनान्स बँक

ESAF स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 4% ते 8.25% पर्यंत FD वर व्याज देत असून दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व झालेल्या एफडीवर 8.25% विक्रमी व्याजदर देण्यात येत आहे. हे FD व्याजदर १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहेत.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3% ते 8.61% पर्यंत FD व्याज देत असून बँक 750 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वात जास्त 8.61% व्याज देत आहे. हे दर 28 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहेत.

जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 3% ते 8.50% दराने व्याज देत असून ग्राहकांना 365 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 8.50% दराने व्याज मिळत आहे. नवीन दर 2 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहेत.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या ठेवीच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 3.5% ते 8.50% पर्यंत व्याजदर देत असून बँक 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.50% इतका विक्रमी व्याज दर देत आहे. हे दर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू होणार आहेत.

Leave a Comment