Bank Complaint to RBI : पुणे : जर कोणतीही सरकारी / खासगी बँक किंवा NBFC आपल्या ग्राहकांना योग्य सेवा देत नसेल किंवा मनमानी शुल्क वसूल करीत असेल तर याची तक्रार करून न्याय मिळवणे शक्य आहे. तुम्ही बँक शाखेत किंवा वरिष्ठांकडे याबाबत अनेकदा तक्रार करूनही दाद न मिळाल्यास तुम्ही थेट आरबीआयकडे तक्रार करू शकता. ग्राहकांच्या बँकिंगशी संबंधित कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे.

अनियंत्रित शुल्क आकारणी, कर्ज पूर्ण झाल्यावर जास्त दंड आकारणी, एनओसी देण्यास खूप विलंब, यासह तुम्ही कोणत्याही बँकिंगशी संबंधित कोणतीही तक्रार आरबीआयकडे करू शकता. अशावेळी जर तुम्हाला बँकेच्या विरोधात आरबीआयकडे तक्रार करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अधिकृत तक्रार पोर्टलवर (cms.rbi.org.in/cms/indexpage.html#eng) जावे लागेल. यानंतर तुम्हाला File A Complaint मध्ये क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला स्क्रीनवर एक कॅप्चा दिसेल. तो तुम्हाला भरावा लागेल. त्यानंतरच एक नवीन पेज उघडेल. यावर तुम्हाला तुमचे नाव आणि मोबाईल टाकून OTP भरावा लागेल. यानंतर तुम्हाला तक्रार करायची आहे त्या बँकेचे नाव टाकावे लागेल. बँकेकडून भरपाईची मागणीही ग्राहक करू शकतात. शेवटी भरलेली माहिती पुन्हा वाचून घेऊन मग सबमिट वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तक्रार क्रमांक मिळेल.

तसेच ग्राहक ऑफलाइन देखील तक्रार पाठवू शकतात. यासाठी तुम्हाला तक्रारीच्या संपूर्ण तपशीलासह RBI ला पत्र लिहावे लागेल. त्यानंतर त्या पत्रावर तुमची सहीही करावी लागेल. तुम्हाला हे पत्र, संबंधित कागदपत्रे, सेंट्रलाइज्ड पावती ही प्रक्रिया केंद्र, 4था मजला, सेक्टर 17, चंदीगड, पिनकोड – 160017 या पत्त्यावर (आरबीआय तक्रार करण्यासाठी पत्ता) पाठवावी लागेल. तुम्ही RBI कडे तक्रार करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण, RBI कडे तक्रार करण्यापूर्वी तुम्हाला संबंधित बँक किंवा NBFC कडे तक्रार करावी लागेल. जर तुम्ही बँकेकडे तक्रार केली असेल आणि तुम्हाला बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसेल, तर 30 दिवसांनंतर तुम्ही RBI कडे तक्रार दाखल करू शकता. महत्वाचे म्हणजे संबंधित विषयावर 1 वर्षाच्या आत तुम्ही RBI कडे तक्रार दाखल करू शकता.

RBI File A Complaint https://cms.rbi.org.in/rbi/vividflow/run/rbi?language=Auto#captchaAuthentication
Track your Complaint Customer Digital Journey (rbi.org.in)
Customer Feedback Customer Digital Journey (rbi.org.in)

Narendra Modi Rojgar melava: महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा!

Business News : “या” व्यवसायात भारत करेल १० वर्षात दुप्पट उत्पादन : पंतप्रधान मोदींना आहे विश्वास

Share.

Leave A Reply

Exit mobile version