Bank Account : आपल्याला कोणताही आर्थिक व्यवहार करायचा असेल तर आपल्याकडे असावे लागते. बँक खात्याशिवाय आपली अनेक कामे अडकू शकतात. त्यामुळे आपल्याकडे बँक खाते असावे. अनेक बँका बचत खात्यावर वेगवेगळे व्याजदर आकारत असते.
तसेच बँका आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुम्हाला बँकेचे नियम माहिती असावेत. नाहीतर एका चुकीने तुमचेही बँक खाते निष्क्रिय होऊ शकते.
…तर तुमचेही खाते होईल निष्क्रिय
एखादे बँक खाते अशा स्थितीत निष्क्रिय होऊ शकते ज्यावेळी ते दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ सतत वापरले जात नाही म्हणजेच त्याच्याशी कोणताही व्यवहार केला जात नाही. अशा वेळ ही बँक खाती आरबीआयच्या नियमांनुसार निष्क्रिय होतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्हीही असेच करत असाल तर व्हा.
आता तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की ज्यावेळी एखादे बँक खाते निष्क्रिय होते, त्यानंतर तुम्हाला या बँक खात्यातून कोणतेही पैसे काढता येत नाही. जर तुमच्या खात्यातून पैसे कधीच काढले गेले नाहीत तर तुम्हाला कस्टमर केअर किंवा तुमच्या बँकेत जाऊन माहिती मिळवावी लागेल.
बँक खाते निष्क्रिय झाले तर काय करावे?
समजा तुम्ही तुमच्या बँक खात्यातून बराच काळ कोणताही व्यवहार केला नसेल आणि आता यामुळे खाते निष्क्रिय झाले असल्यास तर अशा वेळी तुम्हाला ते पुन्हा सक्रिय करावे लागणार आहे. त्याची एक सोपी प्रक्रिया आहे.
खरतर तुम्हाला तुमचे पासबुक बँकेत न्यावे लागेल आणि तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डची स्वाक्षरी केलेली प्रतही घ्यावी लागणार आहे. यानंतर, संबंधित अधिकाऱ्याला भेटा आणि ही कागदपत्रे त्यांच्याकडे जमा करा, त्यानंतर तुमचे बँक खाते पुन्हा सक्रिय करण्यात येईल.