Bank account : प्रत्येकाचे बँकेत खाते असते. जर तुमचा बचत खात्यात पगार येत असेल तर तुम्हाला त्याचे काही आर्थिक तोटे सहन करावे लागू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती.
दोन खात्यांमधील फरक
कंपन्यांच्या सांगण्यावरून पगार खाती चालू केली जातात. कोणत्याही संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन खाते मिळते ज्यात त्यांचा पगार दर महिन्याला येतो. कोणतीही व्यक्ती बचत खाते चालू करू शकते. सामान्यतः, जे लोक नोकरी करत नाहीत किंवा पगारदार नाहीत, ते त्यांचे आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी बचत खाती चालू करू शकतात. त्यातून त्यांना व्याज कमावणारे ठेव खाते मिळते.
पगार खाते चालू करण्याचे फायदे
जर तुमचे पगार खाते असेल तर तुम्हाला त्यात किमान शिल्लक ठेवण्याची कोणतीही गरज पडणार नाही. पगार खात्यासह, तुम्हाला वैयक्तिक चेक-बुक मिळेल. जर तुमचे खाते किमान दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुने असल्यास तुम्हाला त्यात ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल.
ओव्हरड्राफ्ट रकमेची मर्यादा दोन महिन्यांच्या मूळ वेतनाइतकी आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत, तुमच्या बँक खात्यात शिल्लक नसल्यास तुम्ही एका निश्चित मर्यादेपर्यंत पैसे काढू शकता. पगार खातेधारकाचा मृत्यू झाला तर 20 लाख रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा उपलब्ध आहे. जर एखाद्याच्या पगार खात्यात सलग तीन महिने पगार आला नाही, तर बँक त्याचे सामान्य खात्यात रूपांतर करते.
बचत खाते चालू करण्याचे फायदे
तुम्हाला विविध बँकांमध्ये अनेक बचत खाती चालू करता येतील. सर्व सरकारी आणि खाजगी बँका त्यांच्या बचत खात्यांवर विमान अपघातासह जीवन विमा संरक्षण देत असून काही बँका यासाठी खूप कमी शुल्क आकारतात तर काही बँका ते पूर्णपणे मोफत देतात.
तुमच्या बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर रिझर्व्ह बँक 5 लाख रुपयांपर्यंतचे भांडवल संरक्षण प्रदान करत असून सामान्य बचत खाते ग्राहक इतर बँकांच्या एटीएममधून फक्त 10,000 रुपये आणि त्यांच्या स्वत:च्या बँकेतून जास्तीत जास्त 25,000 रुपये काढता येतात. प्रीमियम बचत खातेधारकांना एका दिवसात 1 लाख रुपये काढण्याची परवानगी असून अनेक बँका त्यांच्या प्रीमियम बचत खातेधारकांना एअरपोर्ट लाउंजमध्ये मोफत प्रवेश देतात.