Bank account : जर तुम्ही बँकेत खाते चालू करत असाल तर तुम्हाला बँकेचे सर्व नियम माहिती असावे लागतात. जर तुम्हाला नियम माहिती नसतील तर तुम्हाला आर्थिक फटका सहन करावे लागेल. बँक खाते बंद करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या.
बँक खाते बंद करताना घ्या काळजी
अनेक वेळा इतर व्यवहार बँक खात्याशी जोडलेले असतात पण काही वेळा काही देयके शिल्लक असतात. अशा वेळी तुमचे बँक खाते बंद करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
बँक खात्यात शिल्लक
भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्याही खात्यातील शिल्लक ऋणात्मक नसावी असे म्हटले आहे. खात्यात किमान शिल्लक राखणे गरजेची आहे. त्याची देखभाल न केल्यामुळे खाते बहुतेक वेळा ऋणात जाते. समजा तुम्हाला बँक खाते बंद करायचे असल्यास तुम्हाला ते पैसे आधी द्यावे लागतील. त्यानंतर तुमचे बँक खाते बंद होईल.
क्लोजिंग चार्जेस
समजा तुम्हाला बँक खाते बंद करायचे असेल तर अनेक बँका त्यासाठी क्लोजिंग चार्जेस आकारत असतात. हे शुल्क भिन्न असते. खाते बंद करताना तुम्हाला काही खाते बंद करण्याचे शुल्क भरावे लागू शकते. एका विशिष्ट मर्यादेनंतर बँक खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करून हे शुल्क टाळता येईल.
प्रलंबित व्यवहार
तुमच्या खात्यावर कोणताही व्यवहार प्रलंबित असेल तर तुम्हाला त्याची अंमलबजावणी होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या खात्यावर चेक असेल आणि तो क्लिअर झाला नसेल तर तुम्ही खाते बंद करता येणार नाही. त्यामुळे खाते बंद करण्यापूर्वी, बँकेशी खात्री करा की कोणताही व्यवहार प्रलंबित नाही.
मासिक पेमेंट ॲक्टिव्ह
बँक खात्यावर कोणतेही मासिक पेमेंट ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते आधी निष्क्रिय करावे लागणार आहे. खाते बंद होणार नाही आणि तसे झाले तरी तुमचे नुकसान होईल कारण नंतर मासिक आदेश बंद होईल. हे लक्षात घ्या की हा मासिक पेमेंट आदेश तुमचा विमा प्रीमियम, घर ईएमआय, कर्ज ईएमआय इत्यादी असेल.
बँक लॉकर
बँक लॉकरच्या सुविधेचा लाभ घेत असणारे अनेक ग्राहक आहेत. हे बँक लॉकर्स बँक खात्याशी जोडले असून लॉकरचे भाडे तिथून आपोआप येते. तुम्हीही या सुविधेचा लाभ घेतला असल्यास तुम्हाला तुमचे बँक लॉकर बंद करायच्या खात्यापासून वेगळे करावे लागेल. आणि त्यानंतर खाते बंद करण्यासाठी अर्ज करता येईल. .