Bajaj CNG Bike । समोर आला बहुप्रतीक्षित Bajaj च्या CNG बाईकचा लूक, ‘या’ दिवशी करणार नितीन गडकरी लॉन्च

Bajaj CNG Bike । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 जुलै रोजी बजाज ऑटोची नवीन CNG बाईक लाँच होणार आहे. ग्राहक अनेक दिवसांपासून या बाईकची आतुरतेने वाट पाहत होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बजाज ऑटोची पहिली सीएनजी बाइक असणार आहे. त्यामुळे ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नुकताच याचा कंपनीने टीझरही सादर केला आहे. या टीझरमध्ये या शानदार बाईकची थोडीशी झलक पाहिली जाऊ शकते पण प्रतिमा फारशी स्पष्ट नाही. नवीन CNG बाईकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर CNG बाईकचा स्विच उजव्या बाजूच्या हँडल बारमध्ये पाहायला मिळेल. तर या स्विचच्या मदतीने बाइकला इंधन आणि सीएनजी मोडमध्ये सहज बदलता येतील.

स्टायलिश लूक

या बजाज सीएनजीची रचना साधी असून त्यात गोल हेडलाइट्स असतील. बाइकला थोडा प्रीमियम टच पाहायला मिळेल. बाईकला अधिक ग्राउंड क्लिअरन्स मिळणार आहे ज्यामुळे खराब रस्ते सहज पार करता येतील.

हे लक्षात घ्या की बाइक चालवताना पॉवर आणि मायलेजचा समतोल राखण्यासाठी 125cc इंजिनमध्ये ही बाईक सादर केली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे. टीझर शिवाय, अजूनही बजाजकडून नवीन सीएनजी बाइकबाबत कोणत्याही प्रकारची माहिती आली नाही.

ही बाईक 90,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली जाईल. या बाईकमध्ये 3 ते 5 लिटरचा CNG सिलेंडर मिळेल. जो त्याच्या सीटखाली असेल. बाईक एक किलो सीएनजीमध्ये 90 किलोमीटरपर्यंत मायलेज देईल.

Leave a Comment