Bad Cholesterol : वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवायचंय? आजच आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Bad Cholesterol : धावपळीच्या काळात अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. अनेकांना खराब कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागतो. यामुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवायच असेल तर तुम्हाला आहारात काही पदार्थांचा समावेश करावा लागतो.

खराब कोलेस्ट्रॉल नावाचे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन हृदयाच्या धमन्यांवर साचते आणि हृदयापर्यंत रक्त पोहोचण्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. काही पदार्थ असे आहेत ज्यांचा तुम्ही आहारात समावेश करून खराब कोलेस्ट्रॉलची समस्या टाळू शकता.

सुका मेवा

सुक्या मेव्याचे सेवन केले तर कमी घनतेच्या लिपोप्रोटीन म्हणजेच खराब कोलेस्टेरॉलपासून उत्तम संरक्षण मिळते. यात मल्टीविटामिन आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात. अशा स्थितीत, अक्रोड, अंजीर आणि बदाम खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. पण बदामामध्ये जास्त कॅलरी असल्यामुळे ते कमी प्रमाणातच खावे.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या नेहमीच सुपरफूड मानल्या जात असून त्यांचे सेवन केले तर अनेक आजारांचा धोका टळतो. अशा स्थितीत, खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देण्यात येतो. फ्लॉवर, कोबी, पालक, टोमॅटो इत्यादी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चांगले आहेत.

ओमेगा -3 फॅटी ऍसिड

ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी असून यामुळे रक्तदाब आणि रक्त गोठण्याच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. हे सॅल्मन किंवा ट्यूना माशांमध्ये मुबलक प्रमाणात आढळत असून तुम्ही मोहरी किंवा फ्लेक्स बिया, नाचणी, ज्वारी, बाजरी आणि चिया बिया देखील घेऊ शकता.

ॲव्होकॅडो

खराब कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड खूप उपयुक्त आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो, हे ॲव्होकॅडोमध्ये आढळते. त्यामुळे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी एवोकॅडो खाण्याचा देण्यात येतो. यामुळे चरबी कमी होण्यासही मदत होते.

Leave a Comment