Bacchu Kadu । मोठी बातमी! …तर बच्चू कडू लढवणार नाहीत निवडणूक

Bacchu Kadu । मागील काही दिवसांपासून प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे महायुतीच्या विरोधात बोलत असून अशातच आता त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. १९ तारखेला मी राज्य सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहे. जर राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या तर मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही,” असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “आमच्या मागण्यांचे निवेदन सरकारला सादर करणार आहोत. जर मागण्या मान्य झाल्या, तर मला निवडणूक लढवण्याची गरज नाही. मी माघार येईन. माझी जागा महायुतीला देईन. आमच्या मागण्या मान्य झाल्या तर निवडणुका लढण्याची काय गरज आहे. आमची तिसरी आघाडी नसेल, तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी करणार आहोत. आमची आघाडी पहिली असेल. बाकीच्या सगळ्या आघाड्या नंतर येतील,” असे बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे.

जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्यांनी स्वत:चे उमेदवार उभे करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. यासाठी त्यांनी तिसऱ्या आघाडीची तयारी सुरु केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी छत्रपती संभाजीराजेंशी चर्चा केली होती. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात तिसऱ्या आघाडीच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. राज्य सरकार आता बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment