Ayushman Bharat : केंद्र सरकारने आयुष्मान भारत (Ayushman Bharat) पीएमजेवाय योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड जारी करण्यास सुरुवात केली आहे. या कार्डवर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही योजनांचा उल्लेख असेल. तर, आतापर्यंत फक्त आयुष्मान भारत योजनेचे कार्ड दिले जात होते आणि त्यात राज्याच्या योजनेचा उल्लेख नव्हता. त्यात त्यांच्या योजनेचाही उल्लेख असावा, अशी राज्यांची मागणी होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आता आयुष्मान भारत कार्डचे नाव आयुष्मान कार्ड (Ayushman Card) असेल. त्यावर प्रथम आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन सुरक्षा योजना लिहिली जाईल आणि त्यानंतर संबंधित राज्याच्या योजनेचे नाव घेतले जाईल.
केंद्र आणि राज्य अशा दोन्ही योजनांचे लो (Logo) कार्डवर प्रसिद्ध केले जातील. याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असून, त्यांना केंद्र आणि राज्याच्या आरोग्य योजनांचे स्वतंत्र कार्ड ठेवावे लागणार नाही. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत दहा कोटी कुटुंबांना 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जातो. यामध्ये केंद्राचा वाटा 60 टक्के आणि राज्यांचा वाटा 40 टक्के आहे. तथापि, अनेक राज्ये त्यांच्या स्वत: च्या आरोग्य योजना देखील चालवत आहेत. पश्चिम बंगाल (West Bengal) आणि दिल्लीचा (Delhi) या योजनेत समावेश नाही, परंतु केंद्राला आशा आहे की या नवीन उपक्रमामुळे सर्व राज्ये त्याची अंमलबजावणी करण्यास तयार होतील.
या योजनेच कोण पात्र आहे, याची माहितीही ऑनलाइन पद्धतीने घेता येते. यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही माहिती मिळवू शकता.